digital products downloads

पुण्यात 6 बेकायदेशीर बांगलादेशी महिलांना अटक: बुधवार पेठेत पोलिसांची मोठी कारवाई, तपास सुरू – Pune News

पुण्यात 6 बेकायदेशीर बांगलादेशी महिलांना अटक:  बुधवार पेठेत पोलिसांची मोठी कारवाई, तपास सुरू – Pune News



पुणे शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांविरोधात पुणे पोलिसांनी अत्यंत धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार रविवारी रात्री संपूर्ण पुणे शहरात राबवण्यात आलेल्या ‘कोंबिंग ऑपरेशन’ दरम्यान ६ बेकायदेशीर बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. बुधवार पेठेतील ‘सागर बिल्डिंग’वर छापा टाकून ही धडक कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावळ यांना मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीच्या आधारे फरासखाना पोलीस ठाणे आणि खडक पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने हा छापा टाकला. या मोहिमेत भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ६ बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत या महिलांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांना सुरुवातीला ब्युटी पार्लर, शिवणकाम किंवा घरकाम अशा चांगल्या नोकऱ्यांचे आमिष दाखवून बनावट मार्गाने भारतात आणले गेले होते. मात्र, बुधवार पेठेत आल्यानंतर त्या स्वतःच्या इच्छेने वेश्याव्यवसायात सामील झाल्या. या महिलांना भारतात कोणी आणले, त्यांनी सीमा कशी ओलांडली आणि भारतात राहण्यासाठी बनावट कागदपत्रे कशी मिळवली, याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत. कारवाईचे ‘शतक’ पार पुणे पोलीस परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावळ यांनी पदभार स्वीकारल्यापासून बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. गेल्या अवघ्या ११ महिन्यांत तब्बल १०३ बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना पकडून मायदेशी पाठवण्यात आले आहे. त्यांच्या या विशेष मोहिमेमुळे पुण्यातील बेकायदेशीर घुसखोरांवर कारवाईचा ‘शतक’ पार झाला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp