
International Jamtara in Nashik: पर्यटकांची नगरी म्हणून ओळख असलेली इगतपुरी आता हळूहळू गुन्हेगारांच आश्रयस्थान बनू लागलये. नुकत्याच पडलेल्या केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या छाप्यामुळे पर्यटकांची इगतपुरी की गुन्हेगारांची बजबजपुरी झाली काय असा प्रश्न यामुळे निर्माण झालाये. नाशिक जिल्ह्यात इगतपुरी शहरापासून आठ ते दहा किलोमीटर निर्जन असलेल्या बलाईदु री गावाजवळ निसर्गरम्य रेन फॉरेस्ट रिसॉर्ट आहे. काही एकर परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्तात असलेल्या या रिसॉर्टमध्ये सीबीआयने छापा टाकत सायबर फ्रॉड करणाऱ्या सहा जणांना रविवारी पकडले. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
रोख दागिने सोने आणि काही लॅपटॉप जप्त
या रिसॉर्मधील रूम बुक करून लोकांना विविध आमिष दाखवून फसवण्यासाठी कॉल सेंटर उभारण्यात आले होते. मुंबईत राहणारे हे सर्व जण अँग्री बिझिनेस सबंधित अधिकारी म्हणून लक्झरी गाड्या घेऊन रिसॉर्टवर आले. या महाभागांनी एकूण साठ जणांची नियुक्ती करत फसवणुकीचे आंतरराष्ट्रीय जाळे उभारले. सीबीआय अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून कोट्यावधी रुपये रोख दागिने सोने आणि काही लॅपटॉप जप्त केलेत. ज्यामध्ये देश परदेशातील अनेकांना गंडवल्याचं समोर येत आहे..हे सर्व घडले असले तरी स्थानिक पोलिसांना मात्र कानोकान खबर नव्हती..त्यांना सीबीआय ने माहितीही दिली नाही त्यामुळे केंद्रीय यंत्रणांसमोर स्थानिक पोलिसांच्या बाबतीतील विश्वासार्हता गमावली असल्याचं दिसून येतेय.
या सर्व प्रकरणामुळे रेन फॉरेस प्रशासन अडचणीत आले आहे त्यांना मुंबईत चौकशीकामी आज पाचारण करण्यात आले. यापूर्वीही याच बाबत अनेक तक्रारी पर्यटकांनी केलेले आहेत हॉटेल बाबत बेकायदेशीर कामांच्या बाबतीत तक्रारी पर्यटकांनी केले आहेत तर शहरातील काही रिसॉर्टमध्ये रेव पार्टी आणि जुगाराच्या खेळणाऱ्या काही तरुणांना पकडण्यात आले होते. इगतपुरीत लैला खान हत्या प्रकरण, हिना पांचाळ सह अनेक अभिनेत्रींची रेव पार्टी प्रकरण, आंतरराष्ट्रीय जुगार अड्डा उध्वस्त, ब्ल्यू फिल्म शूटिंग प्रकरण अशी गंभीर प्रकरणे घडली आहेत.
पर्यटन नगरीला गालबोट
इगतपुरी मध्ये अनेक मालमत्ता या मुंबई गुजरातच्या व्यावसायिकांच्या आहेत या मालमत्ता रिसॉर्ट चालवणारे व्यवस्थापन वेगळेच आहे त्यामुळे कारवाई कुणावर करायची असा प्रश्न नेहमी पोलिसांसमोर असतो.आता या वाढणाऱ्या सर्व घटनांमुळे प्रशासन सर्व विभागांशी समन्वय करून रिसॉर्ट चालकांची बैठक घेतली जाणार आहे. राज्यात लोकप्रिय होणाऱ्या पर्यटन नगरीला गालबोट लावण्याचे काम पैसा कमावण्याच्या नादामध्ये काही व्यावसायिक करत आहेत. त्यामुळे पर्यटनाच्या या नगरीला आता पोलिसांच्या कठोर नियमानसह स्व नियंत्रणाची गरज आहे.
गोपनीय माहिती मिळवून परदेशी नागरिकांची फसवणूक
रेनफॉरेस्ट रिसॉर्ट येथे मुंबईतील काही जणांनी बनावट कॉल सेंटर सुरू करून सुमारे ६० कर्मचारी नेमले होते. या माध्यमातून अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांतील नागरिकांना गिफ्ट कार्ड व क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून फसवले जात होते. ८ ऑगस्ट रोजी सीबीआयकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, आरोपी अॅमेझॉन सपोर्ट सर्व्हिसेसचे कॉल सेंटर असल्याचे भासवत परदेशी नागरिकांची गोपनीय माहिती मिळवून त्यांची फसवणूक करत होते.
कोट्यवधीची मालमत्ता ताब्यात
१ सीबीआयने खात्री पटताच शनिवारी छापा टाकला. त्या वेळी ठिकाणी ६२ जण कार्यरत होते, ज्यात टेलिकॉलर्स व व्हेरिफायर यांचा समावेश होता. कारवाईत मुंबईतील विशाल यादव, शेबाझ, दुर्गेश, अभय ऊर्फ राजा आणि समीर ऊर्फ कालिया ऊर्फ सोहेल या पाच जणांना अटक करण्यात आली. २ छाप्यात ४४ लॅपटॉप, ७१ मोबाइल, १.२० कोटी बेहिशोबी रोकड, ५०० ग्रॅम सोने, सात आलिशान गाड्या, ५ लाखांची क्रिप्टोकरन्सी, तसेच १.२६ लाख रुपयांची कॅनेडियन गिफ्ट कार्ड जप्त करण्यात आली.
२० खोल्यांत सेंटर
कॉल सेंटरचे २० खोल्यांत ६० जण वास्तव्यास होते. मुंबईतील एका कंपनीच्या नावाने ८ ऑगस्टपासून तीन दिवस बुकिंग होती. धाडीसाठी सीबीआयचे १५ अधिकारी, चार गाड्यांत आगमन झाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.