
Walmik Karad Shananjay Munde: वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी धनंजय मुंडेंनीच प्रयत्न केले होते असा धक्कादायक दावा बीड पोलिसांच्या सायबर विभागात काम करणारे पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी केला आहे. रणजित कासले हे सध्या निलंबित असून त्यांच्यासंदर्भात खात्याअंतर्गत चौकशी सुरु असतानाच त्यांनी सोशल मीडियावरुन हा धक्कादायक आरोप केला आहे.
…म्हणून मुंडेंनी केलेला एन्काऊंटरचा प्रयत्न
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंची काही प्रकरणे बाहेर काढण्याची शक्यता असल्याने धनंजय मुंडेंकडून कराडच्या एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न झाला असा धक्कादायक आरोप रणजित कासलेंनी केला आहे. यापूर्वीही कासले यांनी असे अनेक गंभीर आरोप केले होते. कासले यांच्या आरोपांमुळे मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
अनेक एन्काऊंटर बोगस असल्याचा दावा
दोनच दिवसांपूर्वीच कासले यांनी परळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मीक कराडचा एन्काऊंटर करण्याची मला सुपारी आली होती असा गौम्यस्फोट स्वतःच्या फेसबुकवर व्हिडिओ प्रसारित करत केला होता. राज्यातील झालेले अनेक एन्काऊंटर बोगस कसे होते याचाही पाढा कासले यांनी या व्हिडीओथ वाचलेला.
या आरोपांवर राऊतांची पहिली प्रतिक्रिया
या आरोपांसंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी, “त्यांचे असेही म्हणणे आहे की, पोलीस डायरीत नोंद केली आहे त्यामध्ये एन्काऊंटर करण्याच्या सूचना होत्या. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात घडलेल्या गोष्टीची पुष्टी करणारे विधान आहे. पोलीस सांगत आहे ते गंभीर आहे. तेव्हाच कारवाई का झाली नाही?” असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. “कराड, मुंडे या सगळ्यांचे काम संपल्यावर मारायचे प्लॅन दिसत आहे,” असंही राऊत म्हणाले.
रणजित कासले यांच्यासंदर्भात थोडक्यात
1. पद – रंजीत कासले हे बीड पोलिसांच्या सायबर विभागात पीएसआय (पोलीस उपनिरीक्षक) म्हणून कार्यरत होते.
2. फसवणूक प्रकरण – सुरत येथील एका व्यापाऱ्याच्या आर्थिक फसवणूक प्रकरणाचा तपास कासले करत होते.
3. निलंबन – तपासादरम्यान आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत बीडच्या पोलीस अधीक्षकांनी त्यांना 26 मार्च रोजी निलंबित केले.
4. चौकशी सुरू – सध्या कासले यांच्यावर खाते अंतर्गत चौकशी सुरू आहे.
5. खळबळजनक व्हिडिओ – कासले यांनी एक व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला असून, त्यात वाल्मीक कराड यांचा एन्काऊंटर करण्याची सुपारी दिली होती असा गंभीर आरोप केला आहे.
6. पूर्वीचे वादग्रस्त व्हिडिओ – यापूर्वीही त्यांनी समाज माध्यमांवर अनेक वादग्रस्त व्हिडिओ अपलोड केले आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.