
नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काही तास आधी शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील अनुमाई नगर परिसरात नागरिकांनी उभारलेल्या बहिष्काराच्या फलकामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नळाला पाणी नाही, तर मतदान नाही, अशी ठाम भूमिका घेत नागरिकांनी थेट मतदान
.
अनुमाई नगरातील ले-आऊटला मंजुरी मिळून अनेक वर्षे लोटली असली तरी कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आजतागायत झालेली नाही. अमृत योजनेअंतर्गत सहा वर्षांपूर्वी घराघरात नळ आणि पाइपलाइन बसविण्यात आली, मात्र मुख्य वाहिनीला पाण्याच्या टाकीशी जोडण्यास नगरपरिषदेकडून केलेल्या दुर्लक्षामुळे काम अधांतरी राहिले. नळ आहेत, पाइप आहेत, पण त्यातून पाण्याचा थेंबही येत नाही अशी कटू परिस्थिती नागरिकांनी उघड करून दाखवली. निवडणूक तोंडावर असताना राजकीय आश्वासनांचा पाऊस पडत असला तरी प्रत्यक्षात काम शून्य असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. गतकाळातील लोकप्रतिनिधींनी आम्हाला सतत फसवले. आज नवीन उमेदवारही त्याच आश्वासनांच्या घोंगड्याखाली फिरत आहेत. पाणी नसताना मतदानाचा अधिकारही अर्थहीन आहे. पाणीपुरवठा सुरू होईपर्यंत आम्ही मतदान करणार नाही, असा ठाम इशारा नागरिकांनी दिला.
फलक लावून रोष केला जाहीर
परिसरात मोठमोठे फलक, पोस्टर लावून नागरिकांनी आपला रोष सार्वजनिक केला आहे. निवडणुकीच्या उंबरठ्यावर नागरिकांचा हा थेट बहिष्कार उमेदवारांसाठी मोठे आव्हान ठरत असून प्रशासनालाही धास्तावून सोडणारा आहे. आता नगर परिषद तात्काळ पुढाकार घेते का? की नागरिकांचा संताप आणखी उग्र होतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



