
Maharashtra Local Body Election 2025 : राज्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. प्रचाराचा जोर वाढला आहे. यामुळे ऐन थंडीत महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रचारादरम्यान, राजकीय नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आली आहेत. प्रचारादरम्यान अनेक नेत्यांनी प्रलोभने देणारी वक्तव्य केली आहेत. यामुळे एकनाथ शिंदे, अजित पवार, चित्रा वाघ, गुलाबराव पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील 20 नेते निवडणूक आयोगाच्या रडावर आले आहेत.
एकनाथ शिंदे, अजित पवार, गुलाबराव पाटील, संजय शिरसाठ, जयकुमार गोरे, चित्रा वाघ यांना प्रलोभने देणारी वक्तव्य भोवणार आहेत. राज्यातील प्रचाराच्या रणधुमाळीत प्रलोभने देणाऱ्या 20 नेत्यांच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून दखल घेतली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने ज्या ठिकाणी संबंधित नेत्यांनी वक्तव्य केली आहेत त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून तत्काळ अहवाल मागवला आहे.
निधीला कात्री लावण्याचे वक्तव्य अजित पवार यांनी केले. गुलाबराव पाटील यांच्याकडून लक्ष्मी दर्शन होणार असल्याचं वक्तव्य करण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्याकडून तिजोरीच्या चाव्या, चित्रा वाघ यांच्याकडून खा कुणाचं पण मटण मात्र दाबा कमळाचं बटण अशी वक्तव्य करण्यात आलीय. अशा प्रकारची वक्तव्य करणाऱ्यांचा अहवला निवडणूक आयोगाने मागवला आहे. आता हा अहवाल मिळाल्यानंतर निवडणूक आयोग काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महालक्ष्मीला कुठे बसायचं कळतयं, महालक्ष्मी कमळावर बसली आहे,त्यामुळे कमळावर बसून लक्ष्मी आपल्या घरात येणार आहे,असं विधान पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी केला आहे.त्या सांगलीच्या जत मध्ये भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये बोलत होत्या,त्या सभेला भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह जत नगरपरिषदेतील उमेदवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



