digital products downloads

‘दोन पोलिसांनी माझ्या भावाला….’, प्रियकराच्या मृतदेहाशी लग्न करणाऱ्या तरुणीचे धक्कादायक खुलासे, ‘वडिलांना फासावर…’

‘दोन पोलिसांनी माझ्या भावाला….’, प्रियकराच्या मृतदेहाशी लग्न करणाऱ्या तरुणीचे धक्कादायक खुलासे, ‘वडिलांना फासावर…’

Nanded Honor Killing: प्रेमप्रकरणातून नांदेडमध्ये झालेले हत्याकांड सध्या राज्यभर गाजत आहे. नांदेडमध्ये ऑनर किलिंगची थरकाप उडवणारी घटना घडली आहे. प्रेमसंबंधाला विरोध असल्याने वडील आणि दोन भावांनी मिळून एका तरुणाची हत्या केली. या घटनेनंतर प्रेयसीने प्रियकराचे घर गाठत त्याच्या मृतदेहाशी लग्न केलं आणि त्याच्या घरीच राहण्याचा निर्णय घेतला, मुलीन हत्या करणाऱ्या वडील आणि भावांना फाशी देण्याची मागणी केली आहे. यादरम्यान पीडिेत कुटुंबाची वकील गुणरत्न सदावर्ते यांनी भेट घेत कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

Add Zee News as a Preferred Source

नेमकी घटना काय?

25 वर्षीय सक्षम ताटे आणि हिमेश मामीडवार दोघे चांगले मित्र होते. दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते. सक्षमचे हिमेशच मामीडवारची 21 वर्षीय बहीण आंचलसोबत सक्षमचे प्रेमसंबंध जुळले. पण दोघेही वेगळ्या जातीचे होते. या प्रेमसंबंधाची माहिती हिमेश आणि घरच्यांना कळाली. त्यांच्या प्रेमसंबंधाला आंचलच्या कुटुंबाचा विरोध होता. जुना गंज भागात सक्षम बसलेला असताना आंचलचे वडील गणेश मामीडवार, भाऊ हिमेश, साहिल अन्य दोघांनी गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याच्या डोक्यात फरशी घालून त्याचा खून केला. 

मृतदेहाशी केलं लग्न

सक्षमच्या खूनाची माहिती मिळाल्यानंतर आंचल त्याच्या घरी पोहोचली. पोस्टमार्टमनंतर सक्षमचा मृतदेह घरी आणण्यात आला. सक्षमचा मृतदेह पाहून तिने टाहो फोडला. सक्षमच्या मृतदेहाला हळद कुंकू लावून आंचलसोबत लग्न लावून देण्यात आले. सक्षम नसला तरी त्याची पत्नी बनून त्याच्याच घरी राहण्याचा निर्णय आंचलने बोलून दाखवला. माझ्या घराचे जिंकूनही हारले आणि तो हारूनही जिंकला असे आंचल म्हणाली. हत्या करणाऱ्या वडील आणि भावाला शिक्षा व्हावी अशी मागणीही तिने केली आहे.

आंचल आमचा मुलगा

आंचल तिच्या मनाने आमच्या घरी आली. ती माझी मुलगी नाही तर मुलगाच आहे. तिच्यात मी सक्षमला पाहीन. तिची साथ कधीही सोडणार नाही अशी प्रतिक्रिया सक्षमची आई संगीता ताटे यांनी दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आंचलचे वडील आणि भावासह एकूण सहा आरोपींना अटक केली आहे. प्रेम प्रकरणातून झालेले हत्याकांड आणि त्यानंतर खरे प्रेम दाखवण्यासाठी आंचलने उचललेले पाऊल यामुळे ही घटना सध्या राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे. 

पोलिसांनी उसकवल्याचा आरोप

दोन पोलिसांनी आपल्या भावांना सक्षमवर हल्ला करण्यासाठी उसकवलं असा आरोप आंचलने केला आहे. आंचलने  धीरज कोमलवार आणि महीत असरवार यांची नावं घेतली आहेत.  “सक्षमची हत्या झाली त्या दिवशी सकाळी 11 वाजताच्या सुमारास, माझा धाकटा भाऊ मला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेला आणि सक्षमविरुद्ध खोटी तक्रार दाखल करण्यास सांगितलं. मी नकार दिला. पोलिसांनी माझ्या भावाला सांगितलं, ‘तू लोकांची हत्या करुन येथे येत राहतोस. मग तुझ्या बहिणीसोबत सामील व्यक्तीला ठार का करत नाहीस?माझ्या भावाने उत्तर दिले, “ठीक आहे, मी संध्याकाळपर्यंत त्याला मारून तुमच्याकेडे येईन.” आंचलने विचारले की जर पोलिस असे वागतील तर लोक त्यांच्यावर कसा विश्वास ठेवू शकतात. 

माझ्या कुटुंबाने माझ्या आणि सक्षमच्या एकमेकांशी लग्न करण्याच्या निर्णयाचं समर्थन करु असं सांगितलं होतं. आम्ही तीन वर्ष एकत्र होतो. आम्ही अनेक स्वप्नं पाहिली. भावांनी आम्ही लग्न आयोजित करु असा शब्द दिला होता. पण त्यांनी मला शेवटच्या क्षणी फसवलं असं आंचलने म्हटलं आहे. 

इंस्टाग्रामवरुन झाली होती ओळख

आंचलने स्पष्ट केले की ती सक्षमशी तिच्या भावांद्वारे नाही तर इंस्टाग्रामवरून ओळख झाली होती. तिने सांगितलं की तिच्या कुटुंबातील सदस्य सक्षमसोबत वेळ घालवत असत. “ते त्याच्याशी चांगले वागायचे आणि एकत्र जेवायचे. त्यांनी त्याला पटवून दिले की सर्व काही ठीक आहे. आम्हाला असे काही घडेल याची कल्पना नव्हती,” असं ती हतबलपणे म्हणाली.

“एके दिवशी, माझ्या वडिलांनी सक्षमला सांगितले की जर त्यांना माझ्याशी लग्न करायचे असेल तर त्यांना आमच्या धर्मात, हिंदू धर्मात यावे लागेल. सक्षम माझ्याशी लग्न करण्यासाठी काहीही करायला तयार होता. पण मला माहित नाही काय झाले,” असंही ती म्हणाली. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp