
आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपावरून अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा आहे. यावर भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी आमची चर्चा झालेली आहे. तसेच इंधनदरवाढीवर देखील महाजन यांनी आरोप केला आहे. ते म्हणाले, पेट्रोल-डिझेलचा काळाबाजार सुरू आहे. गिरीश महाजन म्हणाले, जळगाव आणि नाशिक तसेच संपूर्ण राज्यांमध्ये तिढा आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या संख्याबळानुसार तिकीट मागत आहेत. आम्ही देखील प्रत्येक ठिकाणी भाजपसाठी तिकीट मागत आहोत आणि एक-दोन दिवसात हा तिढा सुटेल, असे महाजन यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे हे नेहमीच दिल्लीला जात असतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठले आहे. यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले, एकनाथ शिंदे हे नेहमीच दिल्लीला जात असतात. त्यांची काही इतर खाजगी कामे असतील. जागा वाटपासाठी ते दिल्लीला गेले असे समजण्याचे काही कारण नाही. विधान परिषदेच्या जागांसाठी उपमुख्यमंत्री दिल्लीला जातील असे मला वाटत नाही. मुख्यमंत्र्यांसोबत एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा पवार हे एकत्रित बसून त्या संदर्भात निर्णय घेतील, असे महाजन यांनी म्हटले आहे. दरम्यान, शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचे चिरंजीव प्रताप पाटीलसाठी जागेची मागणी केली आहे, यावर गिरीश महाजन म्हणाले, वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन त्या पद्धतीने जागा वाटप होईल आणि काय ते ठरेल. नाशिक आणि जळगाव दोन्ही जागांवर शिवसेनेने दावा केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार एकत्रित बसून निर्णय घेतील. पेट्रोल डिझेलच्या समस्येवर काय म्हणाले महाजन? महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांनी रांगा लावल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी थेट हाणामारीपर्यंत घटना घडताना दिसत आहेत. यावर गिरीश महाजन म्हणाले, पेट्रोल-डिझेलची कुठेही समस्या नाही. मात्र नागरिक पेट्रोलचा काळाबाजार करत आहेत. अक्षरशः बाजारात प्लास्टिकचा कॅन देखील विकत मिळत नाही अशी गंभीर परिस्थिती आहे. काही लोक जाणून-बुजून अतिरिक्त साठा तसेच काळाबाजार करत आहेत. खरेखुरे शेतकरी सोडले तर जवळपास 80 टक्के लोक हे काळाबाजार करण्यासाठी पेट्रोल-डिझेल खरेदी करत असल्याचा आरोप महाजन यांनी केला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






