digital products downloads

बावनकुळे यांच्या नावाचे बनावट लेटरहेड प्रकरण: जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या बनावट पत्रावरून गुन्हा दाखल – Amravati News

बावनकुळे यांच्या नावाचे बनावट लेटरहेड प्रकरण:  जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या बनावट पत्रावरून गुन्हा दाखल – Amravati News


अमरावतीत एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. महसूलमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचे बनावट लेटरहेड तयार करून त्यावर खोटी स्वाक्षरी करण्यात आली. हे पत्र जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना पाठवण्यात आले.

.

जिल्हाधिकारी कटियार यांना पत्राबद्दल संशय आल्यानंतर ही बाब उघडकीस आली. पालकमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी योगेश कोठेकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून तपास सुरू केला आहे.

१९ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळालेल्या या पत्रात वरूड नगरपालिकेतील एका वरिष्ठ लिपिकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. पत्रात नमूद केल्यानुसार, या लिपिकाने वरिष्ठांच्या मदतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपालिका विभागात डेप्युटेशनवर नेमणूक मिळवली होती.

पत्रात लिपिकाविरोधात अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यात नागरिकांचे फोन न उचलणे आणि दादागिरी करणे यांचा समावेश आहे. तसेच नगरपालिका विभागातील निम्मे कर्मचारी गैरहजर असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्याशी चर्चा करून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp