digital products downloads

शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा?: ठाकरे-शिंदे गटाची ‘फायनल राऊंड’साठी तयारी, पण कोर्टाकडून पुन्हा ‘वेट अँड वॉच’! – Mumbai News

शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा?:  ठाकरे-शिंदे गटाची ‘फायनल राऊंड’साठी तयारी, पण कोर्टाकडून पुन्हा ‘वेट अँड वॉच’! – Mumbai News



गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात धगधगत असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाचा निकाल पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली, मात्र पुढील सुनावणीसाठी अद्याप कोणताही ‘मुहूर्त’ निश्चित करण्यात आलेला नाही. दोन्ही बाजूंचा लेखी युक्तिवाद अभ्यासल्यानंतर सर्वोच्च न्यायालय पुढील तारीख जाहीर करणार असल्याने, या प्रकरणाचा सस्पेन्स आता अधिकच वाढला आहे. गुरुवारच्या सुनावणीदरम्यान उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. दोन्ही गटांनी (ठाकरे आणि शिंदे) अंतिम युक्तिवादासाठी आपली तयारी दर्शवली आहे. मात्र, न्यायालयाने स्पष्ट केले की, या प्रकरणातील व्याप्ती मोठी असल्याने दोन्ही बाजूंचे लेखी मसुदे आधी अभ्यासले जातील आणि त्यानंतरच अंतिम सुनावणीसाठी वेळ निश्चित केली जाईल. पुढील तारीख सर्वोच्च न्यायालयाकडून नंतर कळवण्यात येणार आहे. तीन वर्षांपासून निकालाची प्रतीक्षा २०२२ मध्ये शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२३ मध्ये ‘धनुष्यबाण’ चिन्ह आणि ‘शिवसेना’ हे नाव एकनाथ शिंदे गटाला दिले. या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले आहे. ही याचिका गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असल्याने शिवसैनिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात निकालाबाबत मोठी उत्सुकता आहे. शिवसेना फुटीची ‘टाईमलाईन’ नेमकी मागणी काय? ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात असा युक्तिवाद केला आहे की, निवडणूक आयोगाचा निर्णय लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या निकालाचा दाखला देत, शिंदे गटालाही त्यांचे चिन्ह ‘तात्पुरते’ असल्याचे जाहीर करावे लागते का? यावरही चर्चा सुरू आहे. राज्यातील आगामी राजकीय समीकरणे आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल अत्यंत कळीचा ठरणार आहे. आता न्यायालय लेखी युक्तिवादाचा अभ्यास करून नेमकी कोणती तारीख देते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp