
Eknath Shinde on BJP: महायुतीमध्ये सरकारमध्ये असलेल्या शिवसेना-भाजपामध्ये एकमेकांच्या पक्षातील नेते, पदाधिकारी यांना प्रवेश दिला जात असल्याने वाद निर्माण झाला. राज्य सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसलेले दोन्ही पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मात्र एकमेकांवर कुरघोडीचा प्रयत्न करताना दिसू लागले होते. डोंबिवलीत शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला भाजपात प्रवेश देण्यात आल्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजेरी लावत त्यांनी आपली नाराजी जाहीर केली. दरम्यान मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले असता त्यांनी शिवसेना नेत्यांना सुनावलं. यादरम्यान आता दोन्ही पक्षांचे नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांनी शिवसेनेला सुनावलं
एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. रविंद्र चव्हाण यांच्यावर शिवसेना मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आपल्या गळाला लावण्याचं काम रविंद्र चव्हाण करत असल्याची तक्रार केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नेत्यांना सुनावलं. “उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली. तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचे आणि भाजपाने केले तर चालणार नाही, असे होणार नाही. येथून पुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका. पथ्य दोन्ही पक्षांनी पाळावं,” असं मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नेत्यांना सुनावलं आहे.
अंतर्गत प्रवेश टाळण्यावर एकमत
एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अंतर्गत प्रवेश टाळण्यावर माझ्यात आणि मुख्यमंत्र्यांमध्ये एकमत झालं असल्याची माहिती दिली. मुख्यमंत्रीही आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना कडक सूचना देतील आणि महायुतील कुठेही मिठाचा खडा पडणार नाही, गालबोट लागणार नाही आणि मतभेद होणार नाही असा विश्वास व्यक्त केला आहे.
“मतभेद होता कामा नये, महायुतीला कुठेही गालबोट लागता कामा नये. महायुतीने लोकसभा, विधानसभा लढलो. महायुती म्हणून एकत्र लढत आपण ऐतिहासिक विजय मिळवला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वातावरण बिघडू नये, खराब होऊ नये अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्री आणि माझी आहे,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
पुढे त्यांनी सांगितलं की, “मुख्यमंत्र्यांनीही आता भाजपा-शिवसेना, शिवसेना-भाजपा किंवा महायुती असे जे अंतर्गत प्रवेश आहेत हे कोणत्याही परिस्थितीत घेतले जाऊ नयेत असं सांगितलं आहे. प्रत्येकाने पक्षाच्या आचारसंहितेचं पालन केलं पाहिजे, मीदेखील आमच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्रीही आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना कडक सूचना देतील आणि महायुतील कुठेही मिठाचा खडा पडणार नाही, गालबोट लागणार नाही आणि मतभेद होणार नाही याची काळजी घेतील”.
शिवसेना मंत्री का नाराज आहेत?
1) भाजप सेनेचे नेते, नगरसेवक व पदाधिकारी यांचा पक्षप्रवेश आपल्या पक्षात करून घेत आहेत
2) ज्यांच्या विरोधात निवडणुका लढल्या त्याच उम्मीद्वार ला भाजप आपल्या पक्षात घेत आहे
3) शिंदेच्या अनेक नेत्यांना किव्हा पालकमंत्री ना , विश्वासात न घेता अनेक निर्णय दिले जातात किव्हा निधी वळवला जातो
4) येऊ घातलेल्या निवडणुकीत युतीचा धर्म पाळला जात नाही
5) निधी मिळवण्यासाठी ही शिंदेच्या मंत्याना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
6) संभाजीनगर, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, कोकण या ठिकाणी भाजपने असे प्रवेश करून घेतलेत. युतीचा धर्म पाळला नाही
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



