
Raigad Politics: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभुमीवर राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. मंत्री दादा भुसेंविरुद्ध निवडणूक ढललेल्या अद्वैत हिरे आणि संजय शिरसाटांविरुद्ध निवडणूक लढलेल्या राजू खरेंचा भाजपात प्रवेश झाला. त्यामुळे महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आला. दुसरीकडे रायगडमध्येही फोडाफोडीचं राजकारण पाहायला मिळालं.सुनिल तटकरे यांना मंत्री भरत गोगावले यांचा मोठा धक्का देत मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड पाडलंय. म्हसळा नगरपंचायत नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवक यांचा शिवसेनेत प्रवेश झालाय. म्हसळा नगरपंचायतीवर भगवा फडकलाय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात आज शिवसेनेने मोठे यश मिळवले. सुनिल तटकरे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या म्हसळा नगरपंचायतीवर शिवसेनेचा पूर्ण ताबा आला. नगराध्यक्षा फरीन बशारत यांच्यासह तब्बल नऊ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आणि शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
मुंबईत प्रवेश सोहळा
हा प्रवेश मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत आणि मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत पार पडला. नव्या सदस्यांचे स्वागत करताना शिंदे गटाने हा विजय “रायगडात शिवसेनेची पुन्हा पकड मजबूत झाल्याचे” संकेत मानले.
आदिती तटकरे यांच्या मतदारसंघात भगदाड
म्हसळा हा भाग मंत्री आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघात येतो. याच मतदारसंघातून आधी सुनिल तटकरे आमदार होते, आता सलग दुसऱ्या टर्मला आदिती तटकरे आमदार आहेत. त्यांच्या घरच्या भागातच नगरपंचायत शिवसेनेकडे गेल्याने तटकरे कुटुंबीयांना मोठा मानहानीकारक धक्का मानला जातो.
गोगावले यांची ठाणे स्टाइल रणनीती यशस्वी
ज्याप्रकारे ठाण्यात भाजपला धक्का देत शिवसेनेने अनेक पदे आपल्याकडे घेतली, तशीच रणनीती आता मंत्री भरत गोगावले यांनी रायगडात वापरली. थेट तटकरे यांच्या गडात घुसून त्यांनी राष्ट्रवादीला मोठे खिंडार पाडले आहे.
रायगडातील राजकीय समीकरणात बदल
म्हसळा नगरपंचायतीवर भगवा फडकल्याने रायगड जिल्ह्यात शिवसेना (शिंदे गट) पुन्हा आक्रमक झाल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात मोठी गळती झाल्याने येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही शिवसेनेला फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
FAQ
१. म्हसळा नगरपंचायतीत नेमके काय घडले?
उत्तर: म्हसळा नगरपंचायतीच्या विद्यमान नगराध्यक्षा फरीन बशारत यांच्यासह एकूण ९ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. त्यामुळे संपूर्ण नगरपंचायत शिवसेनेच्या ताब्यात गेली आणि तिथे भगवा झेंडा फडकला.
२. हा धक्का कोणाला बसला आणि का महत्त्वाचा आहे?
उत्तर: हा सर्वात मोठा धक्का राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे आणि त्यांची कन्या आमदार आदिती तटकरे यांना बसला. कारण म्हसळा हा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात येतो, जो सध्या आदिती तटकरे यांचा आहे आणि याच भागातून आधी सुनिल तटकरे आमदार होते. त्यामुळे त्यांच्या “बालेकिल्ल्यात” शिवसेनेने मुसंडी मारली आहे.
३. प्रवेश सोहळा कुठे आणि कोणाकोणाच्या उपस्थितीत झाला?
उत्तर: हा मोठा प्रवेश सोहळा मुंबईत मुंबईत झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि महसूल मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन सदस्यांचे शिवसेनेत स्वागत करण्यात आले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



