digital products downloads

संभाजीनगरात 5 हजारांच्या हव्यासापाेटी तरुण गांजा तस्करीच्या जाळ्यात: इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या मुलावर पश्चात्तापाची वेळ – Chhatrapati Sambhajinagar News

संभाजीनगरात 5 हजारांच्या हव्यासापाेटी तरुण गांजा तस्करीच्या जाळ्यात:  इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या मुलावर पश्चात्तापाची वेळ – Chhatrapati Sambhajinagar News


गांजान भरलेल्या बॅगची अदलाबदली करून 5‎‎ हजार रुपये मिळवण्याचा ‎‎हव्यास 21 वर्षीय तरुणाला‎‎ चांगलाच महागात पडला. त्याने केलेल्या दाव्यानुसार,‎‎घरातील आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने त्याने हे‎ पाऊल उचलले. मात्र, त्याच्या या पावलामुळे ‎त्याला कमीत कमी

.

पुणे जिल्ह्यातील सिंहगड परिसरातील एका‎ महाविद्यालयात आरोपी किशोर इंजिनिअरिंगच्या ‎दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. त्याच्या मूळ‎गावी केवळ आई वास्तव्यास असते.‎ इंजिनिअरिंगचा मोठा खर्च त्याच्या घरी‎ परवडण्यासारखा नाही. जेमतेम परिस्थितीतून ‎त्याने शिक्षण सुरू केले आहे. त्यातच काही‎ मित्रांनी त्याला गांजा तस्करीच्या जाळ्यात‎ ओढले. त्याच्याकडे इतर जिल्ह्यांतून आलेली 10 किलो गांजाची बॅग केवळ इतर व्यक्तीला सुपूर्द‎ करायची होती.‎

किशाेर सांगळेने मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन‎ परिसरातून संबंधित गांजाची बॅग घेतली. ‎तेथून ती बॅग झेंडा चौकात घेऊन‎ जायची होती. त्या ठिकाणी एक व्यक्ती‎ही बॅग घेऊन जाईल असे ठरले होते.‎ या सर्व कामासाठी त्याला 5 हजार रुपये‎ मिळणार असल्याची कबुली त्याने दिली‎ आहे. आता ही बॅग कुणी दिली व त्याला‎ 5 हजार देणारा कोण, याचा तपास ‎सहायक पोलिस निरीक्षक संजय बहुरे‎ यांचे पथक करत असल्याची माहिती‎ अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणात‎ आणखी किती एजंट आहेत, यादृष्टीने‎ आता तपास सुरू आहे.‎

महाविद्यालयीन तरुणांच्या आडून चालते रॅकेट‎

संपूर्ण राज्यात गांजा, ड्रग्ज यांच्या तस्करीसाठी महाविद्यालयीन ‎तरुणांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. कॉलेजच्या ‎बॅगमधून 20 ते 25 वयोगटातील तरुण पुस्तके व वह्यांच्या आडून‎ त्याची तस्करी करतात. पोलिसांच्या रूटीन तपासात ही मुले ‎सहजासहजी सापडत नाहीत. तपासणी चालू असलेल्या ठिकाणी‎ अभ्यासाचे सामान आहे, घरचे रागावतात असे करून हे विद्यार्थी‎तपास करणाऱ्या अधिकाऱ्याला गंडवतात. विशेष म्हणजे, चांगले‎ राहणीमान व प्रतिष्ठित महाविद्यालयाचे टॅग असलेल्या बॅग‎ असल्याने पोलिस कर्मचाऱ्यांनाही त्यांच्यावर संशय येत नाही.‎

पोलिसांच्या तपासणीत अलगद अडकला जाळ्यात‎

मुकूंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरात पोलिसांकडून नियमित तपासणी सुरू असताना ‎आरोपी तरुणाची आधी चौकशी केली. नंतर तपासणी केली असता त्याच्या जवळील‎ बॅगेत दहा किलो गांजा आढळून आला.‎

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp