
Satara Nagar Parishad Nagar Panchayat Election: साताऱ्यातील म्हसवड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्रीच्या सुमारास गाडी तपासणी केल्याच्या कारणातून भाजपचे आणि शरद पवार गटातील कार्यकर्ते समोरासमोर भिडले. मंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवार गटाचे डॉक्टर सौरभ सावंत यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप आहे. पोलिसांसमोरच मध्यरात्री मारहाणीचा प्रकार घडला. पोलीस ठाण्यात याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
सातारा जिल्ह्यातील 7 नगरपरिषदा व 1 नगरपंचायतींसाठी आज मतदान
सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, मलकापूर, म्हसवड, पाचगणी, रहिमतपूर, वाई या 7 नगरपरिषदा आणि मेढा ही 1 नगरपंचायत अशा एकूण 8 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आज सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत पार पडणार आहे. तर मतमोजणी 3 डिसेंबरला सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होणार आहे.
जिल्ह्यात एकूण 374 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार असून ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी अधिकारी आणि पोलीस कर्मचारी असे एकूण 2352 कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत.
पुण्यातही राडा
मुळशीतील कार्यकर्ते आणि भोरमधील कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत. भोरमधील मतदान केंद्रावर आजी मजी आमदारांचे कार्यकर्ते भिडले. शंकर मांडेकर यांचे कार्यकर्ते आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यामधे वाद झाला. गाडी सोडण्यावरुन हा वाद झाला.
दुसरीकडे भोरमध्ये ईव्हीएम मशीनची हळद कुंकू लावून पूजा केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. मतदान केंद्रावरील केंद्रप्रमुख यांच्यावर कारवाई करण्यात आली. ईव्हीएमची आरती झालेल्या मतदान केंद्रावर नवीन केंद्रप्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत. ईव्हीएमची आरती करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
माथेरानला पाच लाखाची रोख पकडली
माथेरान मध्ये पाच लाखाची रोख शिवराष्ट्र पॅनलच्या कार्यकर्त्यांनी पकडून दिली आहे. माथेरान मध्ये शिंदे गटाची पाच लाख कॅश मतदान केंद्राच्या बाजूला ठेवण्यात आली होती. त्यावेळेला शिवराष्ट्र पॅनलच्या कार्यकर्त्यांना लक्षात येतात त्यांनी शिंदे गटाची आणलेली पाच लाखाचे कॅश पकडून देण्यात आली आहे. त्यावर निवडणूक आयोग आणि पोलिसांमध्ये माहिती घेण्याचं काम सुरू झाले आहे.
बदलापुरात 2 लाखांची रोकड पकडली
बदलापुरात फरारी पथकाने 2 लाखांची रोकड पकडली आहे. बदलापूरच्या सुरवळ चौकात हा प्रकार घडला आहे. बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 2 लाखांच्या रोख रकमेसह इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



