पंतप्रधानांना 12 वर्षे पूर्ण, पण देशाचे 12 वाजले!: मोदींनी नेहरूंच्या कार्यकाळाची बरोबरी केली तरी त्यांची उंची गाठू शकत नाहीत- विजय वडेट्टीवार – Nagpur News

पंतप्रधानांना 12 वर्षे पूर्ण, पण देशाचे 12 वाजले!:  मोदींनी नेहरूंच्या कार्यकाळाची बरोबरी केली तरी त्यांची उंची गाठू शकत नाहीत- विजय वडेट्टीवार – Nagpur News



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दीर्घ पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाची बरोबरी केली असली, तरी ते नेहरूंची वैचारिक उंची कधीच गाठू शकत नाहीत. मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात देशाचे पूर्णपणे 12 वाजले असून जनता महागाई आणि बेरोजगारीने हैराण झाली आहे, असे म्हणत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, सरकारला ओबीसींची स्वतंत्र जनगणना करायची नाही. त्यांचे कारण काय आहे माहिती नाही. कदाचित सरकारला भीती असेल की संख्या पुढे आली तर त्यानुसार सर्व गोष्टी द्याव्या लागतील. सरकारने देशाला कंगाल केले आहे. आम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वच गोष्टीमध्ये आमचा वाटा मिळायला हवा. जितकी लोकसंख्या आहे त्या तुलनेत भागीदारी दिली पाहिजे. यासाठी जनगणना केली पाहिजे. आम्ही काय सरकारच्या बापाचे बांधलेले आहोत काय? आमचा ओबीसींचा कॉलम ठेवला तरच आम्ही सहकार्य करू. सरकारला जर गुन्हे दाखल करायचे असतील तर त्यांनी गुन्हे दाखल करावे. ..तर आम्ही जेलभरो आंदोलन करू विजय वडेट्टीवार म्हणाले की, सरकारने जर आमचा कॉलम दिली नाही आणि माहिती न दिल्यावर गुन्हे दाखल करायचे ठरवले तर आम्ही सर्व ओबीसी मिळून जेलभरो आंदोलन करू. आमच्या हक्काचे तुम्ही देणार नसताल तर आम्ही जेलमध्ये जाण्यासाठी तयार आहोत. ‘ओबीसी कॉलम’ नसल्यास जनगणनेवर बहिष्कार! विजय वडेट्टीवार म्हणाले की, जनगणनेमध्ये ओबीसीचा कॉलम नाही. जनगणनेची पहिली फेरी ही संपत आली आहे. दुसऱ्या फेरीमध्ये आम्ही ओबीसींचा कॉलम ॲड करणार असे सरकार सांगितले जात आहे. मात्र मोदी सरकार हे काही करणार नाही. ओबीसींची संख्या किती आहे हे सरकार पुढे येऊ देणार नाही. यामुळे ओबीसींच्या हक्काचे जे काही आहे ते मिळणार नाही. ओबीसींची जनगणना करणार असे सांगण्यात आले पण तसे कॉलम देण्यात आले नाही. भंडारा जिल्ह्यात ओबीसी जनगणनेवर बहिष्कार टाकला जात आहे. अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आहे. आम्ही देशभरात आंदोलन करण्याची तयारी सुरू करत आहोत. जर ओबीसी कॉलम केला नाही तर आम्ही सहकार्य करणार नाही. सरकार ओबीसींचे मते घेतात पण त्यांच्यासाठी काहीच काम करत नाही. ओबीसी डीएनए आहे म्हणणारे मुख्यमंत्री काही का करत नाही? असा सवाल सुद्धा वडेट्टीवर यांनी केला आहे. सरकारने आमच्यासोबत बेईमानी केली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp