बीड हादरले!: अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने केला गेम, कार्यक्रम ओकेच्या मेसेजने गेले पकडल्या – Beed News

बीड हादरले!:  अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने केला गेम, कार्यक्रम ओकेच्या मेसेजने गेले पकडल्या – Beed News



बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 25 वर्षींय पत्नीने प्रियकराच्या मदतीने अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या 27 वर्षीय पतीचा काटा काढला आहे. अपघाताचा बनाव रचणाऱ्या पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. अपघातानंतर प्रियकराने काम फत्ते झाल्याचा निरोप दिल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. 1 जून रोजी लिंबागणेश ते अंजनवती रस्त्यावर 27 वर्षीय किरण बंडू सोनवणे या तरुणाचा मृतदेह एका दुचाकीखाली दबलेल्या अवस्थेत आढळून आला होता. किरणची अपघाती मृत्यू झाला असे सर्वांना वाटले. पण शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर गळ्यावर आवळल्याचे व्रण आढळून आले होते. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण आणि संशयास्पद फोन कॉल्सचा माग काढत पोलिसांनी थेट मृत किरणची पत्नी प्रियांका सोनवणे (वय 25), तिचा प्रियकर दशरथ परदेशी आणि त्याचा मित्र धीरज येडे यांना बेड्या ठोकल्या. 7 वर्षांपूर्वी झाला होता प्रेमविवाह प्रियांका आणि किरण यांचा 7 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता, परंतु लग्नानंतर किरणला दारूचे व्यसन जडल्याने तो प्रियांकाचा सतत छळ आणि मारहाण करत होता. याच दरम्यान किरणचा मित्र दशरथ परदेशी याच्याशी प्रियांकाचे सूत जुळले. पतीच्या रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या आणि प्रेमात आंधळ्या झालेल्या प्रियांका व दशरथ यांनी दीड महिन्यांपूर्वीच किरणला संपवण्याचा कट रचला. या कटात दशरथने आपल्या मित्राची सुद्धा मदत घेतली. या दोघांनी किरणला निर्जन स्थळी नेत त्याचा गटा दाबून खून केला, आणि अपघाताचा बनाव रचण्यासाठी त्याचा मृतदेह रस्त्याशेजारी दुचाकीखाली दाबून ठेवला. यानंतर गुन्हा लपवण्यासाठी आरोपी धीरजने स्वतःच्या गाडीतून किरणचा मृतदेह रुग्णालयात नेण्याची नाटकबाजी केली, तर प्रियांका घरात बसून रडण्याचे ढोंग करत होती. मात्र खून केल्यानंतर दशरतने प्रियंकाला कार्यक्रम ओके झाल्याचे फोन करत सांगितल्याचे पोलिस तपासात समोर आले. आरोपींना 3 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी या खळबळजनक प्रकरणात आता मयताच्या पत्नीचा थेट सहभाग उघड झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी प्रियांका सोनवणेसह इतर आरोपींना न्यायालयात हजर केले असता, खुनामागील संपूर्ण षडयंत्र, इतर संशयितांची भूमिका आणि गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाचे पुरावे शोधण्यासाठी न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी मंजूर केली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp