उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर सिद्धिविनायकचा विकास: 500 कोटींच्या निधीवर सदा सरवणकरांचे स्पष्टीकरण – Mumbai News

उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर सिद्धिविनायकचा विकास:  500 कोटींच्या निधीवर सदा सरवणकरांचे स्पष्टीकरण – Mumbai News



मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसराचा उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर सर्वांगीण विकास करण्यात येणार असल्याची माहिती सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आणि आमदार सदा सरवणकर यांनी दिली. मंदिर परिसराचे सुशोभीकरण, भाविकांसाठी आधुनिक सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेकडून 500 कोटी रुपयांचा निधी आरक्षित करण्यात आला आहे. मात्र हा निधी थेट सिद्धिविनायक न्यासाकडे दिला जाणार नसून महापालिकेमार्फत विविध विकासकामांवर खर्च केला जाईल, असे सरवणकर यांनी स्पष्ट केले. निधीबाबत सुरू असलेल्या गैरसमजांना उत्तर देताना त्यांनी हा पैसा मंदिराच्या खात्यात जमा होणार नसल्याचे सांगितले. विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील पत्रकार परिषदेत बोलताना सरवणकर म्हणाले की, विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील. पहिल्या टप्प्यात सुमारे 100 ते 150 कोटी रुपयांची कामे करण्यात येणार असून, मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासह भव्य प्रवेशद्वार उभारण्यावर भर दिला जाईल. याशिवाय भाविकांना भेडसावणाऱ्या पार्किंगच्या समस्येवरही कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मुंबई महापालिकेने सुमारे 80 कोटी रुपयांच्या कामांसाठी निविदा काढल्या असून काही कामांना मंजुरीही देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सिद्धिविनायक मंदिर परिसराचा विकास महाकाल कॉरिडॉरच्या धर्तीवर करण्याचा मानस असून, त्यामुळे भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, या प्रकल्पावरून होत असलेल्या टीकेलाही सरवणकर यांनी प्रत्युत्तर दिले. “या कामातून आम्ही कोणतेही पैसे घेतले नाहीत आणि कोणतीही टक्केवारी घेतली जाणार नाही. आयुष्यभर टक्केवारीचे राजकारण करणाऱ्यांनी आमच्यावर आरोप करू नयेत,” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. सिद्धिविनायक मंदिर परिसरातील विकासकामे पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. मान्सून 13 राज्यांत, उद्या मुंबईला धडकणार:यूपीत झाडे उन्मळून पडली, कर्नाटकात गाड्या वाहून गेल्या; MP – राजस्थानला अलर्ट पाच दिवसांत मान्सूनने १३ राज्यांमध्ये धडक दिली आहे. सोमवारी त्याने तेलंगणात प्रवेश केला. सध्या तो मुंबईपासून सुमारे १५० किमी अंतरावर असून, पुढील ४८ तासांत शहरात दाखल होऊ शकतो. त्यानंतर पुढील आठवड्यापर्यंत तो गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या वाटचालीमुळे मैदानी प्रदेशांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे; मात्र, मान्सूनपूर्व हालचालींमुळे अनेक राज्यांमध्ये ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहत आहेत आणि मुसळधार पाऊस पडत आहे. उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये जोरदार वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. सविस्तर वाचा

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp