
Local Body Election: राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीची निवडणूक तोंडावर असतानाच निवडणूक आयोगाने काही ठिकाणी निवडणुकीवर स्थगिती आणली आहे. ज्या नगरपालिका आणि नगरपंचायतीमधील उमेदवारांविरोधात न्यायालयात याचिका दाखल आहे, त्या प्रभागातील निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केली आहे. तसंच नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराविरोधात जिथे याचिका दाखल आहे, तिथे संपूर्ण नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. तिथे 20 डिसेंबर रोजी मतदान घेतले जाणार आहे आणि 21 डिसेंबरला निकाल लागणार आहे. म्हणजेच ही निवडणूक दुसऱ्या टप्प्यात पार पडणार आहे.
कुठे संपूर्ण निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होणार?
पुणे जिल्ह्यातील बारामती, अहिल्यानगरमधील कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी, लातूर जिल्ह्यातील रेणापूर, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, फलटण, सोलापूरमधील मंगळवेढा, यवतमाळ नगरपालिका, वाशिम नगरपालिका, चंद्रपूरमधील घुग्गुस, वर्धामधील देवळी, बुलढाणामधील देऊळगावराजा, अकोला जिल्ह्यातील बाळापूर, हिंगोली जिल्ह्यातील वसमत, नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि धर्माबाद, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री, सोलापूरमधील मंगळवेढा, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे.
कोणत्या जिल्ह्यात, किती प्रभागांमधील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या?
जिल्हा व नगरपालिका/पंचायतींचा प्रभाग
पुणे (९ जागा) : दौंड- प्रभाग ९अ (१ जागा), लोणावळा – ५ब, १०अ (२ जागा), तळेगाव : २अ, ७अ, ७ब, ८अ, ८ब, १० (६ जागा) सातारा (३ जागा): कराड प्रभाग १५ब (१ जागा), मलकापूर – ४अ, ८अ (२ जागा)
सांगली (१ जागा) : शिराळा – प्रभाग ४
सोलापूर (३ जागा) : सांगोला : प्रभाग १ अ, ११अ (२ जागा), मोहोळ ३अ (१ जागा) यवतमाळ (६ जागा): दिग्रस प्रभाग २ब, ५ब, १०ब (३ जागा), पांढरकवडा ८ अ, ११ ब (२ जागा), वणी – १४ अ (१ जागा)
वाशिम (२ जागा): रिसोड – ५ब, १०अ
गडचिरोली (४ जागा): गडचिरोली- १ अ,
४ब, ११ ब (३ जागा), आरमोरी प्रभाग १० चंद्रपूर (४ जागा): गडचांदूर – प्रभाग ८ब (१ जागा), मूल- १०ब (१ जागा), बल्लारपूर – ९अ (१जागा), वरोरा ७ब (१ जागा)
गोंदिया (३ जागा): गोंदिया-३ब, ११ब, १६अ
भंडारा (२ जागा): भंडारा १५अ, १२अ नागपूर (९ जागा) : कोंढाळी- प्रभाग ८, १६ (२ जागा), कामठी १०अ, ११३, १७ब (३ जागा), रामटेक ६अ (१ जागा), नरखेड २ब, ५ब, ७अ (3 जागा)
वर्धा (७ जागा) : वर्धा – प्रभाग श्व, १९ब (२जागा), हिंगणघाट ५अ, ५३, ९अ (३ जागा), पुलगाव २अ, ५अ (२ जागा)
बुलढाणा (९ जागा) : खामगाव – प्रभाग ५अ, ७अ, २ब, १६ब (४ जागा), शेगाव -४अ, ४ब (२ जागा), जळगाव जामोद -प्रभाग ६अ, ६ब, ७ब (३ जागा)
जळगाव (१२ जागा) अमळनेर १अ (१
जागा), सावदा २ब, ४ब, १०८ (३ जागा), यावल ८ब (१ जागा), वरणगाव १०अ, १०क (२ जागा), पाचोरा ११अ व १२ब (२ जागा), भुसावळ ४ब, ५ब, ११ब (३ जागा) नाशिक (७ जागा) सिन्नर प्रभाग २अ, ४अ, ५अ, १०ब (४ जागा), ओझर १अ, ८ब (२ जागा), चांदवड प्रभाग ३ (१ जागा)
अहिल्यानगर (१२ जागा) जामखेड प्रभाग २ब, ४ब (२ जागा), श्रीगोंदा – ७ब (१ जागा), राहुरी २अ (१ जागा), संगमनेर -१ब, रब, १५ब (३ जागा), श्रीरामपूर ३अ (१ जागा), शेवगाव- १ब, ५अ, १२अ (३ जागा), शिर्डी : ६अ (१ जागा)
हिंगोली (२ जागा): हिंगोली ५ब, ११ब
परभणी (३ जागा) : जिंतूर – ११क (१ जागा), पूर्णा : १ब, १०ब (२ जागा) नांदेड (३ जागा): भोकर – प्रभाग पब (१ जागा), कुंडलवाडी – ३अ (१ जागा), लोहा ५८ (१ जागा)
बीड (१० जागा) : धारूर प्रभाग १०अ (१ जागा), अंबाजोगाई – पब, ३अ, ६अ, १०ब (४ जागा), परळी ९अ, १४ब, ३अ आणि ब, ११ब (५ जागा)
धाराशिव (३ जागा) : धाराशिव – प्रभाग २अ, ७ब, १४ब (३ जागा)
छत्रपती संभाजीनगर (८ जागा) : वैजापूर -प्रभाग १अ, २ब (२ जागा), गंगापूर ४ब, ६ब (२ जागा), पैठण ३अ, ६ब, ६अ, ११ब (४ जागा)
ठाणे (७ जागा) : बदलापूर प्रभाग ५, ८, १०, १५, १७, १९ (६ जागा), वाडा प्रभाग क्र.१२ (१ जागा)
पालघर (१ जागा): पालघर पूर्व – प्रभाग १ब
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



