
Ajit Pawar Death In Plane Crash Suspect Sabotage: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत घातताप झाल्याची शंका व्यक्त केली आहे. अमोल मिटकरींनी अनेक प्रश्न उपस्थित करतानाच मुंबई एअरपोर्टवरील सीसीटीव्ही फुटेजच सापडत नसल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे. अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर आता अनेकांनी या अपघातावर संशय व्यक्त केला आहे.अमोल मिटकरी यांनी सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आतापर्यंत केवळ सोशल मीडियावरुन बोलणारा मिटकरींनी ‘झी 24 तास’शी बोलताना अनेक गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधलं आहे.
अजित पवारांचं शरीर फुगलेलं कसं?
‘झी 24 तास’चे प्रतिनिधी जयेश जगड यांच्याशी विशेष चर्चा करताना अमोल मिटकरींनी अजित पवारांच्या मृतदेहासंदर्भात भलतीच शंका व्यक्त केली आहे. “पाण्यात पडल्यानंतर जसं शरीर फुगलेलं असतं तसं शरीर फुगलेलं होतं,” असं मिटकरींनी अजित पवारांच्या मृतदेहासंदर्भात शंका घेताना म्हटलं आहे. एवढ्यावर न थांबता, “मला हा सारा घातपात झाल्याचा संशय आहे, असंही मिटकरींनी म्हटलं आहे.
नक्की वाचा >> अजित पवारांसाठी ‘ते’ विमान कोणी आणि का निवडलं? पायलटचं मद्यपान अन् जळालेल्या सीटचा फोटो
मुंबई विमानतळावरील सीटीटीव्ही फुटेज गायब?
मिटकरींनी मुंबई विमानतळावरील 28 तारखेचं सीसीटीव्ही फुजेट गायब असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. “28 तारखेला सकाळी 8 वाजून 10 मिनिटींनी मुंबईतून खासगी विमानं उड्डाण करता त्या कलिना एअरपोर्टवरील आठ नंबर गेटवर अजित पवारांचं सिसीटीव्ही फुटेज दिसत नाही, ओएसडी (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) सुद्धा त्यांच्यासोबत दिसत नाहीत,” असं मिटकरींनी म्हटलं आहे. “ममता बॅनर्जी जे बोलल्या तेही सहजासहजी बोलल्या नव्हत्या. शरद पवार यांनी त्यावेळेस परिस्थितीला पाहून प्रतिक्रिया दिली होती. शरद पवार यांना या सर्व गोष्टी लक्षात आल्यानंतर ते पुढाकार घेतील,” असा विश्वास मिटकरींनी व्यक्त केला आहे.
…मग विमान पुण्यात का नाही उतरवलं?
बारामतीला विमान लँड करताना अपघात झाला. या ठिकाणी धुकं होतं असं सांगितलं जात होतं. असं असताना मग इथेच विमान उतरवण्याची काय गरज होती असा सवालही मिटकरींनी केला आहे. “पुण्याला लँड करता आलं असतं प्लेन, त्यांनी का नाही केलं हे? याची सर्व चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी मिटकरींनी केली आहे.
नक्की वाचा >> ‘सीटबेल्ट बांधलेला मृतदेह…’; अजित पवारांचा मृतदेह सर्वात आधी पाहणाऱ्या व्यक्तीने सांगितला घटनाक्रम
विमानात नेमके किती जण होते?
तसेच यापूर्वी मिटकरींनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन केलेल्या मागणीचा पुन्हा उल्लेख केला आहे. “विमानात सहा जण होते की पाच जण होते याचे स्पष्टीकरणही दिले पाहिजे,” असंही मिटकरींनी म्हटलं आहे.
अपघात साठेआठला झाला तर त्या नेत्याला साडेसातला कसं समजलं?
एवढ्यावरच न थांबता मिटकरींनी, “साडेसात वाजता राजेश टोपे यांना अपघाताची माहिती मिळाली. मात्र ते साडेआठ ते पावणे नऊदरम्यान विमान कोसळून अपघात झाल्याचं दाखवत आहे. विकिपीडियावर 27 जानेवारीला निधन झाल्याची बातमी होती. विकिपीडियाने तारीख बदलली, हे सारं काय आहे?” असा सवालही त्यांनी केलाय. “हा अपघात नाही घातपात आहे,” असं मिटकरींनी म्हटलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



