दूनाइटेड मराठी

Mumbai Local News: Get all the Latest News in Mumbai including Breaking News, Headlines, Live Updates and Coverage from every area of the city. Check the latest Mumbai news, Also find the breaking Mumbai news related to Mumbai rain, weather, airport, local train, crime, fire, education

पुण्यात हडपसर परिसरातील रुग्णालयात बॉम्बसदृश वस्तू सापडली:  बॉम्ब शोधक पथकाकडून जिलेटिनच्या कांड्या निकामी – Pune News

पुण्यात हडपसर परिसरातील रुग्णालयात बॉम्बसदृश वस्तू सापडली: बॉम्ब शोधक पथकाकडून जिलेटिनच्या कांड्या निकामी – Pune News

हडपसर भागातील एका खासगी रुग्णालयात बुधवारी सायंकाळी बॉम्ब सदृश वस्तू सापडल्याने घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोधक नाशक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तपासणीत बॉम्ब सदृश वस्तूत जिलेटिनच्या कांड्या आढळल्या. पोलिसांच्या पथकाने त्या सुरक्षित ठिकाणी नेऊन निकामी केल्या. हडपसर भागात खासगी रुग्णालय आ...
Read more
गारखेड्यात रेल्वेच्या जेसीबीने केबल तोडली:  33 केव्ही वीजपुरवठा खंडित; महावितरणच्या प्रयत्नाने मध्यरात्री पूर्ववत – Chhatrapati Sambhajinagar News

गारखेड्यात रेल्वेच्या जेसीबीने केबल तोडली: 33 केव्ही वीजपुरवठा खंडित; महावितरणच्या प्रयत्नाने मध्यरात्री पूर्ववत – Chhatrapati Sambhajinagar News

छत्रपती संभाजीनगर येथील गारखेडा परिसरात रेल्वे विभागाच्या जेसीबीने खोदकाम करताना महावितरणची भूमिगत ३३ केव्ही वीजवाहिनी तोडली. यामुळे गारखेडा परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून मध्यरात्री अडीच वाजता हा वीजपुरवठा पूर्ववत केला. मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या स...
Read more
राज्यातील महिलांसाठी आता जिल्हास्तरावर ‘पीसीओडी क्लिनिक’:  हार्मोनल व प्रजनन आरोग्य समस्यांवर विशेष उपचार सुविधा उपलब्ध होणार – Maharashtra News

राज्यातील महिलांसाठी आता जिल्हास्तरावर ‘पीसीओडी क्लिनिक’: हार्मोनल व प्रजनन आरोग्य समस्यांवर विशेष उपचार सुविधा उपलब्ध होणार – Maharashtra News

राज्यातील महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यभर “पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज (पीसीओडी) क्लिनिक” सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या पीसीओडी समस्येवर वेळेत निदान, उपचार आणि समुपदेशन उपलब्ध करून देण्...
Read more
पंतप्रधानांच्या सल्ल्याला मंत्र्यांचीच ‘केराची टोपली’:  साताऱ्यात ‘आवास’ सोहळ्याच्या नावाखाली 400 एसटी बसेस, हेलिपॅड्ससाठी लाखोंची उधळपट्टी – Pune News

पंतप्रधानांच्या सल्ल्याला मंत्र्यांचीच ‘केराची टोपली’: साताऱ्यात ‘आवास’ सोहळ्याच्या नावाखाली 400 एसटी बसेस, हेलिपॅड्ससाठी लाखोंची उधळपट्टी – Pune News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आणि काटकसरीचे आवाहन देशवासियांना केले असताना साताऱ्यात शुक्रवारी प्रधानमंत्री आवास योजनेतील 5 लाख घरांच्या लोकार्पणाचा भव्य सोहळा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्...
Read more
NEET पेपरफुटीचे लातूर कनेक्शन?:  42 प्रश्न जुळल्याच्या दाव्यानंतर क्लासेसचे संचालक चौकशीच्या फेऱ्यात; तक्रारीनंतर पोलिसांचा तपास वेगात – Dharashiv News

NEET पेपरफुटीचे लातूर कनेक्शन?: 42 प्रश्न जुळल्याच्या दाव्यानंतर क्लासेसचे संचालक चौकशीच्या फेऱ्यात; तक्रारीनंतर पोलिसांचा तपास वेगात – Dharashiv News

देशभरात गाजत असलेल्या NEET (UG) 2026 पेपरफुटी प्रकरणात आता लातूरचे नाव पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिकनंतर आता लातूरमधील एका खासगी क्लासेसची चौकशी सुरू करण्यात आली असून, एका विद्यार्थिनीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीमुळे या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. मॉक टेस्टमध्ये विचारलेले 42 प्रश्न प्र...
Read more
भारतीय रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई:  सर्वोदय सहकारी बँकेचा परवाना केला रद्द; खराब आर्थिक असल्याचे आले निदर्शनास – Mumbai News

भारतीय रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई: सर्वोदय सहकारी बँकेचा परवाना केला रद्द; खराब आर्थिक असल्याचे आले निदर्शनास – Mumbai News

भारतीय रिझर्व्ह बँकेने अपुरे भांडवल, उत्पन्नाची कमी शक्यता आणि बँकिंग नियामक कायद्यातील तरतुदींचे पालन न केल्याचा ठपका ठेवत सर्वोदय सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. या निर्णयामुळे बँकेचा सर्व बँकिंग व्यवहार आजपासून तात्काळ प्रभावाने बंद झाला असून, महाराष्ट्र सहकारी आयुक्त आणि संस्था निबंधकांना बँकेच्...
Read more
भातकुलीतील बोरखडी, इस्माइलपुर ठरले:  स्वगणना पूर्ण करणारे जिल्ह्यातील पहिले गाव – Amravati News

भातकुलीतील बोरखडी, इस्माइलपुर ठरले: स्वगणना पूर्ण करणारे जिल्ह्यातील पहिले गाव – Amravati News

अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील बोरखडी बुजुर्ग आणि इस्माईलपूर या दोन गावांनी १०० टक्के स्वगणना पूर्ण करून जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. ही दोन्ही गावे स्वगणना पूर्ण करणारी जिल्ह्यातील पहिली गावे ठरली आहेत. भारत सरकारच्या जनगणना विभागाने महाराष्ट्र दिनापासून (१ मे) स्वगणना सुरू केली आहे. जिल्हाधिकार...
Read more
मुंबईतील भायखळा परिसरात गोळीबार:  डी-कंपनीच्या हस्तकाचा मुलगा जखमी, हल्लेखोर पसार; पोलिस घटनास्थळी दाखल – Mumbai News

मुंबईतील भायखळा परिसरात गोळीबार: डी-कंपनीच्या हस्तकाचा मुलगा जखमी, हल्लेखोर पसार; पोलिस घटनास्थळी दाखल – Mumbai News

मुंबईतील गजबजलेल्या भायखळा परिसरात गोळीबाराची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात समीर शेख नावाचा तरुण जखमी झाला असून, भरवस्तीत अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात मोठी घबराट पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात...
Read more
अमरावती 45.4 अंश सेल्सिअसवर, उष्णतेचा ‘येलो अलर्ट’:  16 मे पर्यंत तापमान वाढण्याची शक्यता, नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन – Amravati News

अमरावती 45.4 अंश सेल्सिअसवर, उष्णतेचा ‘येलो अलर्ट’: 16 मे पर्यंत तापमान वाढण्याची शक्यता, नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन – Amravati News

अमरावतीमध्ये तापमानाने पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. आज शहराचे तापमान ४५.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने अमरावती जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला असून, १६ मे पर्यंत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. गेल्या पंधरवड्यात अमरावतीचे तापमान ४३ ते ४...
Read more
RTI कार्यकर्त्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या:  मंडळ अधिकाऱ्याच्या डोळ्यांदेखत घडला थरार, विरारमधील घटनेने खळबळ – Mumbai News

RTI कार्यकर्त्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या: मंडळ अधिकाऱ्याच्या डोळ्यांदेखत घडला थरार, विरारमधील घटनेने खळबळ – Mumbai News

पालघर जिल्ह्यातील विरार पूर्व येथील शिरगाव परिसरात एका खदानीत आरटीआय कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, हे भीषण हत्याकांड मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्या डोळ्यांदेखत घडले असून, हल्लेखोरांनी त्यांनाही जखमी करत त्यांच्...
Read more
महादेव जानकरांचा मेंढपाळांच्या वाड्यावर मुक्काम:  चुलीवरच्या भाकरीचा घेतला आस्वाद, गोधडी पांघरून पालावर काढली रात्र – Solapur News

महादेव जानकरांचा मेंढपाळांच्या वाड्यावर मुक्काम: चुलीवरच्या भाकरीचा घेतला आस्वाद, गोधडी पांघरून पालावर काढली रात्र – Solapur News

राजकीय वर्तुळापासून काहीसे दूर असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक आणि माजी मंत्री महादेव जानकर सध्या एका वेगळ्या कारणाने चर्चेत आले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना जानकरांनी चक्क एका मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम करून आपल्या साधेपणाची प्रचिती दिली. मोकळ्या माळरानावर, मेंढपाळांसोबत जम...
Read more
समृद्धी महामार्ग, प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग यामध्ये कोणाच्या जमिनी?:  सरकारमध्ये हिंमत असेल तर दोन्ही प्रकल्पाच्या भूसंपादनांची श्वेतपत्रिका काढावी- रोहित पवार – Mumbai News

समृद्धी महामार्ग, प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग यामध्ये कोणाच्या जमिनी?: सरकारमध्ये हिंमत असेल तर दोन्ही प्रकल्पाच्या भूसंपादनांची श्वेतपत्रिका काढावी- रोहित पवार – Mumbai News

समृद्धी महामार्ग आणि प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनात मोठा संशयास्पद व्यवहार झाला असून, प्रकल्प अधिकृतपणे जाहीर होण्यापूर्वीच सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आणि काही ‘भोंदूबाबां’ना याची माहिती कशी मिळते, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवा . रोहित पवार म्हणाले की, भूसंपादनाची माहिती शासकीय अध...
Read more
तुटलेली खेळणी, झाडे सुकली, कचरा साचला:  106 उद्यानांची कंत्राटे रखडली, दुरवस्थेमुळे ज्येष्ठ नागरिक, बंच्चे कंपनीने फिरवली पाठ‎ – Amravati News

तुटलेली खेळणी, झाडे सुकली, कचरा साचला: 106 उद्यानांची कंत्राटे रखडली, दुरवस्थेमुळे ज्येष्ठ नागरिक, बंच्चे कंपनीने फिरवली पाठ‎ – Amravati News

महानगरपालिका क्षेत्रात मनपाची २१८ उद्याने असून त्यापैकी १०६ उद्याने कंत्राटी तत्त्वावर दिली जातात. परंतु, जुने कंत्राट संपुष्टात आल्यानंतर नवी कंत्राटी प्रक्रियाच गेल्या काही वर्षांपासून रखडल्यामुळे मनपाच्या बहुतेक उद्यानांची दुर्दशा झाल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले. मोकळ्या जागेत लॉन नाही. गवतही उद्...
Read more
मुंबई पोलिसांची मोठी कारवाई:  17 कोटींहून अधिक मूल्याचे ड्रग्ज जप्त, 12 जणांच्या आवळल्या मुसक्या – Mumbai News

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई: 17 कोटींहून अधिक मूल्याचे ड्रग्ज जप्त, 12 जणांच्या आवळल्या मुसक्या – Mumbai News

मुंबई आणि ठाणे परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई सत्र राबवत तब्बल 17 कोटींहून अधिक मूल्याचे ड्रग्ज जप्त केले आहेत. मुंबईतील वर्सोवा (अंधेरी) परिसरात अँटी नार्कोटिक्स सेलच्या कांदिवली युनिटने छापा टाकून 3.82 कोटी रुपये किमतीचे 765 ग्रॅम हेरॉईन जप्त करत दोन आरोपींना ताब्यात घेतले, तर दुसरीकडे...
Read more
नागपुरात संघाच्या कार्यकर्ता विकास वर्गाचे उद्घाटन:  शताब्दी वर्षातील प्रशिक्षण वर्गात 880 स्वयंसेवक सहभागी – Nagpur News

नागपुरात संघाच्या कार्यकर्ता विकास वर्गाचे उद्घाटन: शताब्दी वर्षातील प्रशिक्षण वर्गात 880 स्वयंसेवक सहभागी – Nagpur News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय’ चे सोमवारी नागपूरच्या रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात उद्घाटन झाले. संघाच्या शताब्दी वर्षातील हा वर्ग असल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या २५ दिवसीय प्रशिक्षण वर्गात देशभरातून सुमारे ८८० स्वयंसेवक सहभागी झाले असून,...
Read more
आईने बचत गटातून पैसे काढून मला उभं केलं:  मदर्स डे निमित्त संजू राठोडचा आईला सलाम; महालक्ष्मी सरसमध्ये सांगितला संघर्षाचा प्रवास – Mumbai News

आईने बचत गटातून पैसे काढून मला उभं केलं: मदर्स डे निमित्त संजू राठोडचा आईला सलाम; महालक्ष्मी सरसमध्ये सांगितला संघर्षाचा प्रवास – Mumbai News

मुंबईच्या बीकेसी येथे सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस 2026’ या भव्यदिव्य प्रदर्शनामध्ये महिला बचत गटांच्या उत्पादनांसोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. 10 मे 2026 रोजी झालेल्या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमात खानदेशातील गावातून पुढे आलेला आणि आज जगभर आपल्या गाण्यांमुळे लोकप्रिय ठरले...
Read more
नाशिक TCS प्रकरण: महिलांचे लैंगिक शोषण आणि मानसिक छळ:  राष्ट्रीय महिला आयोगाचा धक्कादायक अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर – Nashik News

नाशिक TCS प्रकरण: महिलांचे लैंगिक शोषण आणि मानसिक छळ: राष्ट्रीय महिला आयोगाचा धक्कादायक अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर – Nashik News

नाशिक येथील TCS बीपीओ युनिटमधील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणाने आता मोठे वळण घेतले आहे. या गंभीर घटनेची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने सखोल चौकशीअंती 50 पानांहून अधिकचा धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला असून, तो पुढील कार्यवाहीसा...
Read more
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न:  पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला; दखलपात्र गुन्ह्याची मागणी – Pune News

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न: पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला; दखलपात्र गुन्ह्याची मागणी – Pune News

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी एका ३० वर्षीय तरुणाने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, बंडगार्डन पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेमुळे त्याला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. राम शिवाजी पाचकाळे (वय ३०, रा. भोर, पुणे) असे या तरुणाचे नाव आहे...
Read more
सोन्याची मागणी घटल्यास 1 कोटी रोजगार धोक्यात:  पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंत जीजेसी अध्यक्ष राजेश रोकडे यांनी व्यक्त केली चिंता – Nagpur News

सोन्याची मागणी घटल्यास 1 कोटी रोजगार धोक्यात: पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंत जीजेसी अध्यक्ष राजेश रोकडे यांनी व्यक्त केली चिंता – Nagpur News

सोन्याची मागणी घटल्यास देशातील १ कोटींहून अधिक रोजगार धोक्यात येतील, अशी चिंता ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (GJC) चे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी काही काळ सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केल्यानंतर, रोकडे यांनी या उद्योगासमोरील व्यावहारिक...
Read more
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच:  आयात महिला नेत्याला संधी? शायना एनसी यांचे नाव आघाडीवर – Mumbai News

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच: आयात महिला नेत्याला संधी? शायना एनसी यांचे नाव आघाडीवर – Mumbai News

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण भोवल्याने रूपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे सध्या हे अत्यंत महत्त्वाचे पद रिक्त आहे. महायुतीच्या सत्तावाटपात हे पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले असून, यासाठी पक्षात इच्छुकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत आ...
Read more
मी अशोक खरातला आध्यात्मिक श्रद्धेपोटी गुरू मानले होते:  दुसरी बाजू माहीत नव्हती, रूपाली चाकणकरांचा एसआयटीसमोर दावा – Pune News

मी अशोक खरातला आध्यात्मिक श्रद्धेपोटी गुरू मानले होते: दुसरी बाजू माहीत नव्हती, रूपाली चाकणकरांचा एसआयटीसमोर दावा – Pune News

राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आता तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची काल नाशिक येथे विशेष तपास पथकाकडून (SIT) तब्बल ६ तास चौकशी करण्यात आली. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्वतः चाकणकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्त...
Read more
प्रगतिशील शेतकरी:  दुष्काळी माळरानावर केशर आंब्याची बाग; 35 एकरांतून 1 कोटी उत्पन्न, लातूरच्या शेतकऱ्याचा जिद्दी प्रयोग – Dharashiv News

प्रगतिशील शेतकरी: दुष्काळी माळरानावर केशर आंब्याची बाग; 35 एकरांतून 1 कोटी उत्पन्न, लातूरच्या शेतकऱ्याचा जिद्दी प्रयोग – Dharashiv News

मराठवाडा म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो पाचवीला पुजलेला दुष्काळ. पण याच मातीत जिद्द असेल तर काय घडू शकते, याचे उत्तम उदाहरण लातूरच्या एका तरुण शेतकऱ्याने घालून दिले. निलंगा तालुक्यातील तांबाळा येथील नरसिंग मल्लिकार्जुन लंगोटे या शेतकऱ्याने आपल्या 35 एकर खडकाळ माळरानावर 12 हजार केशर आंब्यांची लागवड केली....
Read more
आदर्श हायस्कूलचा दहावीत 100 टक्के निकाल:  130 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत; भूमिका साखरे 97% गुणांसह प्रथम, जानवी येवले द्वितीय – Amravati News

आदर्श हायस्कूलचा दहावीत 100 टक्के निकाल: 130 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत; भूमिका साखरे 97% गुणांसह प्रथम, जानवी येवले द्वितीय – Amravati News

दर्यापूर येथील आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत १०० टक्के निकाल लावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील तब्बल १३० विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण होऊन शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. या निकालात एकूण १०२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर...
Read more
अमरावती जिल्हा परिषदेत बदली सत्र सुरू:  चार विभागांतील 38 कर्मचाऱ्यांचे स्थानांतर; आरोग्य विभागाचा टप्पा बाकी – Amravati News

अमरावती जिल्हा परिषदेत बदली सत्र सुरू: चार विभागांतील 38 कर्मचाऱ्यांचे स्थानांतर; आरोग्य विभागाचा टप्पा बाकी – Amravati News

अमरावती: जिल्हा परिषदेतील सर्वसाधारण बदली प्रक्रियेला रविवारी सुरुवात झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सत्रात चार विभागांतील ३८ कर्मचाऱ्यांचे स्थानांतर करण्यात आले. ही प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने अत्यंत पारदर्शक वातावरणात पूर्ण झाली. आरोग्य विभागातील उर्व...
Read more
भोंदू अशोक खरात प्रकरण:  रूपाली चाकणकरांची एसआयटीकडून 6 तास चौकशी; आर्थिक व्यवहार आणि पूजा-विधींबाबत विचारले प्रश्न – Nashik News

भोंदू अशोक खरात प्रकरण: रूपाली चाकणकरांची एसआयटीकडून 6 तास चौकशी; आर्थिक व्यवहार आणि पूजा-विधींबाबत विचारले प्रश्न – Nashik News

राज्याला हादरवून सोडणाऱ्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता राजकीय धागेदोरे अधिक घट्ट होताना दिसत आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्री रूपाली चाकणकर यांची तब्बल ६ तास कसून चौकशी केली. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांन...
Read more
वसईत विवाह सोहळ्यानंतर तुंबळ हाणामारी:  हुंड्यावरून आनंदाच्या सोहळ्यात वादाचे गालबोट, वधू-वर पक्षाकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल – Mumbai News

वसईत विवाह सोहळ्यानंतर तुंबळ हाणामारी: हुंड्यावरून आनंदाच्या सोहळ्यात वादाचे गालबोट, वधू-वर पक्षाकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल – Mumbai News

वसई पश्चिमेकडील एका विवाहसोहळ्यात आनंदाच्या वातावरणाला हुंडा आणि देण्या-घेण्याच्या वादाचे गालबोट लागले आहे. किरकोळ वादातून सुरू झालेली शाब्दिक चकमक इतकी विकोपाला गेली की, दोन्ही पक्षांतील मंडळींनी एकमेकांवर अक्षरशः हल्ला चढवला. या राड्याचा ‘लाईव्ह’ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, लग...
Read more
पुण्याच्या नांदेड सिटीतील सून हत्या प्रकरण:  फरार सासरा 8 दिवसांनंतर जळगावमध्ये जेरबंद, खून करून घराला कुलूप लावून झाला होता पसार – Pune News

पुण्याच्या नांदेड सिटीतील सून हत्या प्रकरण: फरार सासरा 8 दिवसांनंतर जळगावमध्ये जेरबंद, खून करून घराला कुलूप लावून झाला होता पसार – Pune News

पुण्याच्या उच्चभ्रू नांदेड सिटी परिसरात आपल्या सुनेची निर्घृण हत्या करून गेल्या आठ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या भानुदास भास्कर चौधरी या सासर्‍याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने अटक केली आहे. सुनेला संपवून फरार झालेला हा आरोपी जळगावमध्ये लपून बसला असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा र...
Read more
विहीर खचल्याने वडिलांसह 2 मुले गाडली गेली:  संभाजीनगरच्या धानोऱ्यातील मन सुन्न करणारी घटना; मोटार पंप बसवताना दुर्घटना – Maharashtra News

विहीर खचल्याने वडिलांसह 2 मुले गाडली गेली: संभाजीनगरच्या धानोऱ्यातील मन सुन्न करणारी घटना; मोटार पंप बसवताना दुर्घटना – Maharashtra News

शेतातील विहिरीतून मोटारपंप बसवताना अचानक विहीर खचून झालेल्या दुर्घटनेत वडिलांसह 2 मुलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात घडली आहे. एका क्षणात कुटुंबातील 3 कर्ते पुरुष गेल्यामुळे पीडित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, सिल्लोडच्या धानोर...
Read more
‘जानुबाईच्या नावानं चांगभलं’ च्या जयघोषात भोसे नगरी दुमदुमली:  पारंपरिक वाद्ये, लेझीम पथक आणि फटाक्यांच्या आतषबाजीत छबिना‎ – Solapur News

‘जानुबाईच्या नावानं चांगभलं’ च्या जयघोषात भोसे नगरी दुमदुमली: पारंपरिक वाद्ये, लेझीम पथक आणि फटाक्यांच्या आतषबाजीत छबिना‎ – Solapur News

“जानुबाईचं चांगभलं… कोकणच्या आईचं चांगभलं…” अशा भक्तिमय जयघोषात, नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी भोसे (ता. पंढरपूर) येथील श्री जानुबाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. हलगी, लेझीम आणि गजीढोल अशा पारंपारिक वाद्यांच्या गजराने संपूर्ण गाव भक्तीच्या रंगात न्हाऊन निघ...
Read more
जिल्हा परिषदेच्या 44 अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण:  बदली झालेल्या शिक्षकांना जनगणना काम पूर्ण करण्याचे निर्देश – Amravati News

जिल्हा परिषदेच्या 44 अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण: बदली झालेल्या शिक्षकांना जनगणना काम पूर्ण करण्याचे निर्देश – Amravati News

अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ४५ पैकी ४४ अतिरिक्त विषय शिक्षकांचे यशस्वीपणे समायोजन केले आहे. या शिक्षकांना बदली होऊनही देशासाठी महत्त्वाचे असलेले जनगणना कार्य पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेतील डॉ. पंजाबर...
Read more
अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी पुनर्परीक्षा 14 मे रोजी:  विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर प्राधिकारिणीने घेतला निर्णय – Amravati News

अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी पुनर्परीक्षा 14 मे रोजी: विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर प्राधिकारिणीने घेतला निर्णय – Amravati News

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील काही अभ्यासक्रमांच्या पुनर्परीक्षा १४ मे रोजी होणार आहेत. विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींनंतर विद्यापीठाच्या प्राधिकारिणीने हा निर्णय घेतला आहे. परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या परीक्षा गुरुवारी, १४ मे रोजी आयोजि...
Read more
भावेश भाटिया देणार उद्योगाचे धडे:  नेत्रहीन उद्योजक अमरावतीत, उद्या सांस्कृतिक भवनात कार्यक्रम – Amravati News

भावेश भाटिया देणार उद्योगाचे धडे: नेत्रहीन उद्योजक अमरावतीत, उद्या सांस्कृतिक भवनात कार्यक्रम – Amravati News

नेत्रहीन उद्योजक भावेश भाटिया ११ मे रोजी अमरावतीकरांना उद्योग, व्यक्तित्व विकास आणि स्वप्नपूर्तीसाठी बहुमोल टिप्स देणार आहेत. शाश्वत कन्सेप्ट स्कूलतर्फे आयोजित हा कार्यक्रम श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक नाट्यगृहात सायंकाळी ६.३० वाजता सुरू होईल. प्रयास सेवांकुर संस्थेचे प्रमुख डॉ. अविनाश सावजी यांनी सां...
Read more
युवकांनी ‘विकसित भारत 2047’ चे शिल्पकार बनावे- केंद्रीय मंत्री सिंधिया:  डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात 18,720 स्नातकांना पदवी – Pune News

युवकांनी ‘विकसित भारत 2047’ चे शिल्पकार बनावे- केंद्रीय मंत्री सिंधिया: डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात 18,720 स्नातकांना पदवी – Pune News

केंद्रीय दळणवळण आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी युवकांना ‘विकसित भारत २०४७’ चे शिल्पकार बनण्याचे आवाहन केले. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या (डीपीयू) १७ व्या पदवीप्रदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या सोहळ्यात ९ विद्याशाखांमधील एकूण १...
Read more
TCS धर्मांतर प्रकरणावरून राजकारण तापले:  धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा आरोप – Mumbai News

TCS धर्मांतर प्रकरणावरून राजकारण तापले: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा आरोप – Mumbai News

नाशिकच्या टीसीएस (TCS) कंपनीतील कथित अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला अटक झाल्यानंतर आता या प्रकरणाला तीव्र राजकीय वळण मिळाले आहे. निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप असलेल्या एमआयएम (MIM) नगरसेवकावरून सत्ताधारी भाजप आणि शिंदेसेना आक्रमक झाली असतानाच, काँग्रेसने या संपूर्ण प्रकरणाल...
Read more
वृक्ष लागवडीची चौकशी दडपण्याचा प्रयत्न:  सामाजिक वनीकरण विभागाकडून कागदपत्रे देण्यास टाळाटाळ, स्मरणपत्रांना प्रतिसाद नाही – Hingoli News

वृक्ष लागवडीची चौकशी दडपण्याचा प्रयत्न: सामाजिक वनीकरण विभागाकडून कागदपत्रे देण्यास टाळाटाळ, स्मरणपत्रांना प्रतिसाद नाही – Hingoli News

कळमनुरी तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाकडून केलेल्या वृक्षलागवडीच्या कामाची चौकशी दडपण्यासाठी वनीकरण विभागाकडून चौकशी पथकाला कागदपत्रे सादर केली जात नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे पाच वेळा पत्र देऊनही वनीकरण विभागाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने चौकशी पथकाने या संदर्भातील सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे...
Read more
शिंदेसेनेत प्रवेशानंतरही बच्चू कडूंचा पहिला दणका:  दिव्यांगांच्या प्रश्नावर आंदोलनाचा थेट इशारा; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम – Mumbai News

शिंदेसेनेत प्रवेशानंतरही बच्चू कडूंचा पहिला दणका: दिव्यांगांच्या प्रश्नावर आंदोलनाचा थेट इशारा; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम – Mumbai News

शिवसेनेत प्रवेश करून अवघ्या दहा दिवसांत विधान परिषदेवर निवडून आलेले बच्चू कडू आता पुन्हा आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. राज्यातील दिव्यांग आणि नेत्रहीन बांधवांना मिळणारे संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान गेल्या काही महिन्यांपासून रखडल्याने बच्चू कडूंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ...
Read more
महिला संघटनांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल बहिणींना सहकार्य करावे- ज्योती राठी:  विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी महिला संगठनचा पदग्रहण साेहळा उत्साहात साजरा‎ – Akola News

महिला संघटनांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल बहिणींना सहकार्य करावे- ज्योती राठी: विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी महिला संगठनचा पदग्रहण साेहळा उत्साहात साजरा‎ – Akola News

सामाजिक संस्था समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करतात. महिला संघटनांचे योगदान मोठे आहे. विशेषत: आर्थिकदृष्ट्या कमकुवत बहिणींना महिला संघटनांनी सहकार्य करून, समाजातील एका वर्गाला प्रगतीकडे घेऊन जावे, असे मार्गदर्शन अखिल भारतीय माहेश्वरी महिला संगठनच्या अध्यक्षा ज्योती राठी यांनी केले. विदर्भ प्रादेशिक माहेश्वर...
Read more
भूमिपुत्रांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय:  जिल्हा सहकारी बँकांमधील 70 टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव; शासन निर्णय जारी – Mumbai News

भूमिपुत्रांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय: जिल्हा सहकारी बँकांमधील 70 टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव; शासन निर्णय जारी – Mumbai News

राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील (DCCB) नोकरभरतीबाबत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यापुढे जिल्हा बँकांमधील रिक्त पदांच्या भरतीमध्ये ७० टक्के जागा संबंधित जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. सहका...
Read more
नागपुरात भररस्त्यात भिकाऱ्यांच्या दोन गटांत तुफान राडा:  किरकोळ वादातून हाणामारी अन् दगडफेक; वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण – Nagpur News

नागपुरात भररस्त्यात भिकाऱ्यांच्या दोन गटांत तुफान राडा: किरकोळ वादातून हाणामारी अन् दगडफेक; वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण – Nagpur News

उपराजधानी नागपूरमधील गजबजलेल्या कस्तुरचंद पार्क जवळील एलआयसी चौकात आज संध्याकाळी भिकाऱ्यांच्या दोन गटांत थरारक हाणामारी झाल्याची घटना घडली. भर वाहतुकीत झालेल्या या दगडफेकीमुळे आणि लाठ्याकाठ्यांच्या वापरामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. . मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी सहा वाजेच्या...
Read more
कलिंगड खाऊन मृत्यूप्रकरणात पुन्हा ट्विस्ट:  घरात सापडलेले औषध उंदीर पळवण्याचे; मग शरीरात ‘झिंक फॉस्फाइड’ आले कुठून? – Mumbai News

कलिंगड खाऊन मृत्यूप्रकरणात पुन्हा ट्विस्ट: घरात सापडलेले औषध उंदीर पळवण्याचे; मग शरीरात ‘झिंक फॉस्फाइड’ आले कुठून? – Mumbai News

मुंबईच्या पायधूनी येथील डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासात आता एक मोठी माहिती समोर आली आहे. यापूर्वी उंदीर मारण्याच्या औषधामुळे या चौघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात होता. मात्र, पोलीस तपासात डोकाडिया यांच्या घरातून जे औषध जप्त करण्यात आले, ते उंदीर ‘मारण...
Read more
पुणे आरएमसी उद्योग उद्यापासून सुरू:  प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादानंतर मार्ग मोकळा; लवकरच हेल्पलाईन सेवा – Pune News

पुणे आरएमसी उद्योग उद्यापासून सुरू: प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादानंतर मार्ग मोकळा; लवकरच हेल्पलाईन सेवा – Pune News

पुणे जिल्ह्यातील रेडी मिक्स काँक्रीट (RMC) उद्योगासमोरील पेच अखेर सुटला आहे. पुणे आरएमसी असोसिएशनने उद्या, शनिवार, ९ मे २०२६ पासून जिल्ह्यातील सर्व आरएमसी प्लांट पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर हा मार्ग मोकळा झाला...
Read more
गॅस टँकरच्या धडकेत दाम्पत्याचा जागीच मृत्यू:  खेड शिवापूर टोलजवळ अपघात, संतप्त नागरिकांकडून टँकरची तोडफोड – Pune News

गॅस टँकरच्या धडकेत दाम्पत्याचा जागीच मृत्यू: खेड शिवापूर टोलजवळ अपघात, संतप्त नागरिकांकडून टँकरची तोडफोड – Pune News

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्याजवळ शुक्रवारी दुपारी झालेल्या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. एका गॅस टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वारजे...
Read more
मुंबईत जवळपास 50 टक्के नालेसफाईचे काम पूर्ण:  31 मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे बीएमसीला निर्देश– आमदार अमित साटम – Mumbai News

मुंबईत जवळपास 50 टक्के नालेसफाईचे काम पूर्ण: 31 मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे बीएमसीला निर्देश– आमदार अमित साटम – Mumbai News

पावसाळ्यातील पूरस्थितीमुळे मुंबईकरांना होणारा त्रास कमी करण्यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी सांगितले की, मुंबईतील जवळपास 50 टक्के नालेसफाईचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश बीएमसीला देण्यात आले आहेत. आमदार साटम यांनी पश्चिम उपनगरांतील बांद्रा, जुहू, अंध...
Read more
महाराष्ट्राने नाकारलं, ठाकरे आता तामिळनाडूत मुख्यमंत्रीपद शोधताय का?:  भोपळा मिळवल्याबद्दल ट्रम्प यांनी ठाकरेंचे अभिनंदन करायला हवे होते- नवनाथ बन – Mumbai News

महाराष्ट्राने नाकारलं, ठाकरे आता तामिळनाडूत मुख्यमंत्रीपद शोधताय का?: भोपळा मिळवल्याबद्दल ट्रम्प यांनी ठाकरेंचे अभिनंदन करायला हवे होते- नवनाथ बन – Mumbai News

तामिळनाडूमध्ये कोणाला सत्तास्थापनेसाठी बोलवायचे यासाठी राज्यपाल समर्थ आहेत.संजय राऊत यांनी राज्यपाल बनू नये. लोकभावनेचा आदर राखण्याचे काम राज्यपालांकडून करण्यात येईल. सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे अस्वस्थ आहेत, तुम्हाला वाटत असेल की तामिळनाडूमध्ये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची संधी मि...
Read more
वातावरणात बदल:  10 दिवसांत पारा 6 अंशांनी घसरला, निफाड @ 37 अंश, एप्रिल महिन्यात 43 अंशापर्यंत गेले हाेते तापमान – Nashik News

वातावरणात बदल: 10 दिवसांत पारा 6 अंशांनी घसरला, निफाड @ 37 अंश, एप्रिल महिन्यात 43 अंशापर्यंत गेले हाेते तापमान – Nashik News

एरव्ही थंड तालुका म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कडाक्याचे ऊन पडत असल्यामुळे नागरिकांना तीव्र उष्णतेच्या झळा सोसाव्या लागल्या. एप्रिल महिन्यात ४३ अंशांपर्यंत गेलेल्या तपमानाला कुठेतरी आता ब्रेक लागला असून, दहा दिवसानंतर निफाडचे तापमान ३७ अंशांवर येऊन पोहोचले आहे. सह...
Read more
अकोल्यात चिमुकलीवर अत्याचार करणारा नराधम जेरबंद:  दोन दिवसांनंतर जंगल परिसरातून अटक, पोलिस आणि वन विभागाची संयुक्त कामगिरी – Akola News

अकोल्यात चिमुकलीवर अत्याचार करणारा नराधम जेरबंद: दोन दिवसांनंतर जंगल परिसरातून अटक, पोलिस आणि वन विभागाची संयुक्त कामगिरी – Akola News

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात एका 10 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी जगराम आडे (वय 60) याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. घटनेनंतर दोन दिवसांपासून फरार असलेला हा आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता, मात्र स्थानिक गुन्हे शाखा आणि वन विभागाने राबवलेल्या संयुक्त मोहिमेत त्याला आले...
Read more
भारत-व्हिएतनाम बिझनेस फोरममध्ये महाराष्ट्राचा पुढाकार:  छत्रपती संभाजीनगर ते हो चि मिन्ह सिटी विमानसेवेचा प्रस्ताव, CM फडणवीसांची माहिती – Mumbai News

भारत-व्हिएतनाम बिझनेस फोरममध्ये महाराष्ट्राचा पुढाकार: छत्रपती संभाजीनगर ते हो चि मिन्ह सिटी विमानसेवेचा प्रस्ताव, CM फडणवीसांची माहिती – Mumbai News

भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील संबंध अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र विश्वासार्ह भागीदार म्हणून कार्य करण्यास सज्ज आहे. व्हिएतनाम सोबत सांस्कृतिक, आर्थिक आणि परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम या...
Read more
लॉकडाऊनमध्ये गमावला रोजगार:  कुटुंबासाठी केली शेतमजूरी, आज 35 प्रकारच्या लोणच्यांचा ब्रँड; चित्रा बोरुडे यांची यशोगाथा – Mumbai News

लॉकडाऊनमध्ये गमावला रोजगार: कुटुंबासाठी केली शेतमजूरी, आज 35 प्रकारच्या लोणच्यांचा ब्रँड; चित्रा बोरुडे यांची यशोगाथा – Mumbai News

महालक्ष्मी सरस २०२६ मध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला उद्योजकांनी आपल्या भागातील पारंपरिक चवी मुंबईकरांसमोर मांडल्या आहेत. हस्तकला, ग्रामीण उत्पादने आणि खाद्यसंस्कृती यांचा सुंदर संगम या मेळ्यात पाहायला मिळत आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मेंडकी गावच्या चित्रा विशाल बोरुडे यांनी सादर केले...
Read more
6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार: आरोपीला 24 तासांत अटक:  लोणी काळभोर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले – Pune News

6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार: आरोपीला 24 तासांत अटक: लोणी काळभोर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले – Pune News

लोणी काळभोर पोलिसांनी एका ६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला २४ तासांच्या आत अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून पोलिसांनी तातडीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव श्रीधर लिंबाजी कांबळे (वय ४६ वर्षे, रा. भीमनगर, थेऊर, ता. हवेली, जि. पुणे) अ...
Read more
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp