digital products downloads

गॅस टँकरच्या धडकेत दाम्पत्याचा जागीच मृत्यू: खेड शिवापूर टोलजवळ अपघात, संतप्त नागरिकांकडून टँकरची तोडफोड – Pune News

गॅस टँकरच्या धडकेत दाम्पत्याचा जागीच मृत्यू:  खेड शिवापूर टोलजवळ अपघात, संतप्त नागरिकांकडून टँकरची तोडफोड – Pune News



पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्याजवळ शुक्रवारी दुपारी झालेल्या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. एका गॅस टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वारजे माळवाडी येथील राजेंद्र बबन मोरे (वय ५५) आणि सविता राजेंद्र मोरे (वय ४२) हे दाम्पत्य त्यांच्या एमएच १२ एफएच ४६९६ या दुचाकीवरून साताऱ्याकडे जात होते. खेड शिवापूर टोल नाक्याच्या पाठीमागील सातारा लेनवर आले असता, एपी ०३ टीई ५७५९ या गॅस टँकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, मोरे दाम्पत्य टँकरखाली ओढले गेले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, टँकर आणि दुचाकी दोन्ही वाहने वेगात होती. टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. धडकेनंतर दुचाकी रस्त्याच्या कडेला दूरपर्यंत फेकली गेली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि पोलिसांना कळवले. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. गंभीर दुखापतींमुळे दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. संतप्त नागरिकांनी गॅस टँकरची तोडफोड केली, ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वाहतूक सुरळीत करत अपघाताचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी टँकर चालक राज किशन बी. (रा. तिरुपुरम) याला ताब्यात घेतले असून, या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp