
फूलंब्री | नगरपंचायत अंतर्गत रमाई घरकुल आवास योजनेतून शहरातील ३८ पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले असून, गुरुवारी या लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्रांचे अधिकृत वाटप नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे उपनगराध्यक्ष जमीर पठाण, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राणी पवन घोडके पाणीपुरवठा सभापती, सुष्मेश प्रधान सभापती, योगेश मिसाळ गटनेता, नगरपंचायत यांची प्रमुख उपस्थिती होती. रमाई आवास योजनेअंतर्गत शहरातील अनेक गरजू नागरिकांनी घरकुल मंजुरीसाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननीअंती पात्र ठरलेल्या ३८ नागरिकांच्या घरकुलांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. गुरुवारी आयोजित एका विशेष कार्यक्रमात मंजुरी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






