
प्रतिनिधी | लासूर स्टेशन नागपूर-मुंबई मार्गावरील वसुसायगाव पुलाजवळ भरधाव कारच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. भास्कर अरुण माळी (२८) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास चारचाकी (एमएच १७ डीएस ३९८२) छत्रपती संभाजीनगरवरून लासूर स्टेशनकडे येत होती. यावेळी वसुसायगाव येथील पुलाजवळ लासूरस्टेशनकडून आंबेगाववाडी येथे जाणारा दुचाकीस्वार भास्कर अरुण माळी हा दुचाकी (एमएच २० एफएल ९७८२) वर जात असताना कार व दुचाकीची जोरदार धडक झाली. यात भास्कर माळी हा जागीच मृत्यूमुखी पडला. माहिती मिळताच लासूर स्टेशन येथील रुग्णवाहिका चालक, शिवसेना शहरप्रमुख मयूर जैस्वाल, माजी उपसरपंच गणेश व्यवहारे, सहायक फौजदार धनंजय गोंडे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने छत्रपती संभाजीनगरला उपाचारासाठी दाखल केले. दुचाकीचे पुढचे चाक तुटून पडले अपघातात पुलावरील पाइप असलेले कठडे तोडून कार पुलाखाली जाऊन उलटली. तर कारच्या धडकेत मोटारसायकलचे पुढील चाक तुटून पडले. अपघातानंतर दोन्ही वाहन पुलाखाली जाऊन पडले होते. मृत माळी हा पोलिस पाटील ज्ञानेश्वर बनकर यांच्या जार वाटप करणाऱ्या वाहनांवर चालक म्हणून कामावर होता.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






