digital products downloads

बिर्याणीनंतर टरबूज खाल्ले; मुंबईमध्ये चार जणांचा मृत्यू: पायधुनी परिसरातील टरबूज विक्रेत्याची चौकशी – Mumbai News

बिर्याणीनंतर टरबूज खाल्ले; मुंबईमध्ये चार जणांचा मृत्यू:  पायधुनी परिसरातील टरबूज विक्रेत्याची चौकशी – Mumbai News



पायधुनी परिसरातील नळबाजार भागात एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू झाला. रविवारी (२५ एप्रिल) रात्री नातेवाइकांसह एकूण ९ जणांनी एकत्र बिर्याणीचे जेवण केले होते. मात्र, जेवणानंतर मध्यरात्री ज्या चार जणांनी कलिंगड (टरबूज) खाल्ले त्यांना विषबाधा झाली आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला. इतर पाच जण सुरक्षित असल्याने मृत्यूचे मुख्य कारण कलिंगड की आणखी काही, असा संशय आहे. नळबाजार येथील मुघल बिल्डिंगमध्ये अब्दुल्ला डोकाडिया (४०) यांचे कुटुंब राहते. रविवारी रात्री नातेवाइकांसोबत जेवण झाल्यानंतर मध्यरात्री उकाडा जाणवत असल्याने अब्दुल्ला, त्यांची पत्नी नसरीन आणि दोन मुली (झैनब आणि आयशा) यांनी कलिंगड खाल्ले. पहाटे ६ वाजता चौघांनाही अचानक उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाला. इमारतीतील डॉ. जैद कुरेशी यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र, प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना तातडीने जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकापाठोपाठ चौघांचा मृत्यू रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान परिस्थिती हाताबाहेर गेली. सर्वात आधी १३ वर्षीय झैनबचा मृत्यू झाला. त्यानंतर दुपारच्या सुमारास पत्नी नसरीन आणि मोठी मुलगी आयशा यांनीही उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. कुटुंबाचे प्रमुख अब्दुल्ला यांच्यावर रात्री साडेदहा वाजेपर्यंत उपचार सुरू होते, मात्र त्यांचीही झुंज अपयशी ठरली. एकाच कुटुंबातील चार मृत्यूंमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. दुकानदाराची चौकशी सुरू जे.जे. मार्ग पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “नेमकी विषबाधा कलिंगडामुळे झाली की जेवणातील अन्य कोणत्या पदार्थामुळे, याचा सखोल तपास सुरू आहे. कुटुंबाने ज्या विक्रेत्याकडून कलिंगड आणले होते, त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मृतदेहांचे विच्छेदन करण्यात आले असून, वैद्यकीय अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp