digital products downloads

‘हजारोंसे भारी, एक नारी’: शेकडो ‘नारी शक्ती’ पुढं येऊन भाजपचा मुखवटा टराटरा फाडतील; महिलेच्या व्हिडिओवरून रोहित पवारांची टीका – Pune News

‘हजारोंसे भारी, एक नारी’:  शेकडो ‘नारी शक्ती’ पुढं येऊन भाजपचा मुखवटा टराटरा फाडतील; महिलेच्या व्हिडिओवरून रोहित पवारांची टीका – Pune News



मुंबईच्या वरळी येथे महायुतीच्या आक्रोश मोर्चामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत एका सामान्य महिलेने भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना चांगलेच सुनावल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या महिलेने थेट ‘गेट आऊट’ म्हणत गिरीश महाजन यांना सुनावले होते. आता या प्रकरणावरून विरोधकांकडून भाजपवर निशाणा साधण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. रोहित पवार ट्विट करत म्हणाले, नौटंकी करणाऱ्या भाजपाला एकट्या महिलेने भर रस्त्यात उघडं करुन खऱ्या अर्थाने ‘हजारोंसे भारी… एक नारी’ हे सिद्ध केलं..! ही ‘नारी शक्ती’ खऱ्या अर्थाने ‘वंदनीय’ आहे. आता त्या भगिनीला पोलिसांकडून जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, पण तसं झालं तर सत्यासाठी भिडणाऱ्या अशा शेकडो ‘नारी शक्ती’ पुढं येऊन भाजपचा मुखवटा पुन्हा टराटराsss फाडतील..!, अशा शब्दात पवारांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. जोरदार रिॲक्शन मिळणारंच तसेच एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले होते की, अनेक लोकांना आरोग्याच्या अडचणी असतात आणि अशा परिस्थितीत केवळ केंद्रातून आदेश आले म्हणून आणि His Masters Voice ला खूष करण्याच्या प्रयत्नात एखादा पक्ष लोकांना तीन-तीन तास ट्रॅफिकमध्ये अडकवून ठेवत असेल तर त्याची जोरदार रिॲक्शन मिळणारंच. पुढे रोहित पवार म्हणाले, अशाच एका संतप्त महिलेचा मुंबईतील व्हिडिओ बघायला मिळाला. आंदोलनाचं कारण सत्य असेल तर लोकं समजून घेतात… पण खोट्यासाठी लोकांना वेठीस धरलं जात असेल तर लोक तोंडावर कशी फजिती करतात, हेच या व्हिडिओतून दिसतं. आता त्रस्त व्यक्ती रागावल्याने काही वेळा शब्द चुकीचे जाऊ शकतात पण म्हणून संबंधित लाडक्या बहिणीवर कारवाई न करता तिच्या भावना समजून घेऊन तिला त्रास देणाऱ्यांनीच आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे…! इथून चालते व्हा हा एकच आवाज जास्त पॉवरफुल ठरला- विजय वडेट्टीवार कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील सोशल मीडियावर या महिलेचा व्हिडिओ शेअर करत भाजपवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, भाजपच्या महिला आघाडीला वाटलं असेल की घोषणाबाजीने आसमंत दणाणून सोडला की महिलांचे प्रश्न सुटले! पण भाजपच्या कार्यकर्त्यांना काय माहित, की खरी नारी शक्ती काय असते! त्यांच्या फोकनाड घोषणांपेक्षा सामान्य महिलेचा इथून चालते व्हा हा एकच आवाज जास्त पॉवरफुल ठरला. इव्हेंटच्या कॅमेऱ्यात शक्ती प्रदर्शन शूट होत असताना अचानक सामान्य मुंबईकर महिलेने भाजपला आरसा दाखवला.” वाचा सविस्तर

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp