digital products downloads

मारवडचे प्राथमिक आरोग्य केंद्र ‘राम भरोसे’: रात्रीच्या वेळी कुलूप असल्याने जखमी मुलीला उपचाराविना घरी नेण्याची वडिलांवर आली वेळ‎ – Jalgaon News

मारवडचे प्राथमिक आरोग्य केंद्र ‘राम भरोसे’:  रात्रीच्या वेळी कुलूप असल्याने जखमी मुलीला उपचाराविना घरी नेण्याची वडिलांवर आली वेळ‎ – Jalgaon News



अमळनेर तालुक्यातील मारवड‎येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा‎भोंगळ कारभार समोर आला आहे.‎गुरुवारी रात्री उपचारासाठी‎आलेल्या एका बालिकेला आरोग्य‎केंद्राला कुलूप असल्याने‎उपचाराविना परतावे लागले. या‎प्रकारामुळे खेडी येथील ग्रामस्थांनी‎तीव्र संताप व्यक्त केला असून हे‎आरोग्य केंद्र नक्की कुणाच्या‎भरवशावर सुरू आहे, असा प्रश्न‎उपस्थित केला जात आहे.‎ तालुक्यातील खेडी येथील प्रवीण‎जगन्नाथ पाटील यांची मुलगी‎गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास‎घरात चक्कर येऊन पडली.‎त्यामध्ये ती जखमी झाली. गावात‎वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे तिचे‎वडील तिला तातडीने मारवड‎येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात‎घेऊन गेले. मात्र, कोट्यवधी रुपये‎खर्च करून उभारलेल्या या सुसज्ज आरोग्य केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारालाच कुलूप होते. रात्रपाळीत एकही वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी तेथे उपस्थित नव्हता. अखेर उपचार न मिळाल्याने वडिलांना आपल्या जखमी मुलीला घेऊन माघारी फिरावे लागले. मारवड हे पंचक्रोशीतील मुख्य आरोग्य केंद्र असून त्याअंतर्गत चार उपकेंद्रे येतात. मात्र, मुख्य केंद्रातच सेवा कोलमडली असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेबाबत खेडी येथील ग्रामस्थ तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. अशी माहिती ग्रामस्थांनी यावेळी दिली. दोन दिवसांत कर्मचारी ‎रात्री उपस्थित राहणार‎ सध्यास्थितीत दवाखान्यासह‎कर्मचारी निवासाचे बांधकाम सुरु‎ आहे. विजेची सुविधा नसल्याने‎कर्मचाऱ्यांना रात्रपाळीस अडचणी‎येतात. त्यामुळे ते उपस्थित राहू‎शकले नाहीत. दोन ते तीन दिवसात‎कर्मचारी उपस्थित राहतील. असे‎वैद्यकीय अधिकारी डॉ. साहिल‎चौधरी यांनी सांगितले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp