
खंडाळा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संलग्नित, श्री साई जनविकास प्रतिष्ठान संचलित कृषी महाविद्यालय खंडाळा येथील तीन प्राध्यापकांना उत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चंदीगड येथे झालेल्या जागतिक कृषी परिषदेत हे पुरस्कार देण्यात आले. परिषदेत कृषी क्षेत्रातील प्रख्यात तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, धोरणकर्ते सहभागी झाले होते. डॉ. समाधान लक्ष्मण चोपडे यांना उत्कृष्ट विस्तार शास्त्रज्ञ पुरस्कार मिळाला. त्यांनी पीएचडीमध्ये हवामान बदलाचे जनावरांवर होणारे परिणाम यावर संशोधन केले. त्यांना डॉ. एम. सी. अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले. शेतकरी उत्पादक कंपनीच्या सदस्यांवर होणारे परिणाम यावरही त्यांनी काम केले. प्रा. कैलास अंबादास भालेराव यांना उदयोन्मुख उद्यानशास्त्रज्ञ पुरस्कार मिळाला. संत्र्याच्या नुसलर जातीची वाढ, फळगळती, उत्पन्न, गुणवत्ता यावर सूक्ष्म पोषक तत्त्वांच्या मातीतील आणि पानावरील फवारणीच्या परिणामाचा अभ्यास त्यांनी केला. या संशोधनासाठी त्यांना पुरस्कार देण्यात आला. त्यांना डॉ. एम. बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. भारतीय कृषी संशोधन परिषद दिल्लीकडून घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली आहे. प्रा. अश्विनी दौलत भोसले यांनाही उद्यानविद्या क्षेत्रातील पुरस्कार मिळाला. संत्र्याच्या नुसलर जातीची वाढ, फळगळ, उत्पन्न, गुणवत्ता यावर होणारे परिणाम यावर त्यांनी संशोधन केले. त्यांना डॉ. एम. बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. भारतीय कृषी संशोधन परिषद दिल्लीकडून घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली आहे. अश्विनी भोसले
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






