digital products downloads

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्ष: ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेच्या लोगोचे अनावरण; 15 एप्रिलपासून ‘जल व्यवस्थापन पंधरवडा’ – Mumbai News

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्ष:  ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेच्या लोगोचे अनावरण; 15 एप्रिलपासून ‘जल व्यवस्थापन पंधरवडा’ – Mumbai News


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयांतीच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून जलसंपदा विभागाने आयोजित केलेल्या गोदा ते नर्मदा जलयात्रेच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

.

जलसंपदा विभागाने जल व्यवस्थापन पंधरवडा दि.१५ एप्रिल पासून केले आहे.याचाच एक भाग म्हणून गोदा ते नर्मदा जल यात्रेची संकल्पना जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवीं होळकर यांनी जल व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कार्याचा विचार कृतीत उतरविण्याच्या उद्देशाने गोदा ते नर्मदा यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणाले.

यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेण्यसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.यात्रेच्या यशस्वीतेसाठी अनेक मार्गदर्शक सूचना त्यांनी केल्या.यात्रेच्या निमिताने तयार करण्यात आलेल्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले आले.जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

गोदा ते नर्मदा यात्रेचा शुभारंभ दोन ठिकाणाहून करण्यात येणार आहे.गोदानदीचे उगमस्थान असलेल्या श्रीक्षैत्र त्र्यंबकेश्वर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेल्या श्रीक्षैत्र चौंडी येथून करण्यात येईल यात्रेचा समारोप मध्यप्रदेश मधील महेश्वर येथे नर्मदा तिरी होणार आहे.यात्रेच्या मार्गावर विविध सांसकृतिक अध्यात्मिक कार्यक्रम तसेच जलसंवर्धनाच्या संदर्भात सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून शेतकरी विद्यार्थी महीला तसेच जलवव्यस्थापन क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तीच्या सहभागातून यात्रेचा उपक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न असल्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणाले.

हे ही वाचा…

उष्णतेच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी राज्य शासन सज्ज:नागपुरात उभारणार राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था – मंत्री गिरीश महाजन

वातावरणीय बदलांमुळे राज्यात हवामानात मोठे आणि अनियमित बदल दिसून येत आहेत. मे महिन्यात पाऊस, एप्रिलमध्ये गारपीट तसेच वर्षभर विविध ठिकाणी पावसाच्या घटना वाढत असल्याचे चित्र आहे. उष्णतेसारख्या आपत्तीचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी ठोस प्रणाली निर्माण केली जात असून यासाठी मानक कार्यपद्धती (SOP) तयार करण्यात आली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. सविस्तर वाचा…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial