digital products downloads

अंगावर तेल, डोईवर धगधगते निखारे; कौठवाडीत घुमला ‘हुई..हुई..’चा नाद: बिरोबा यात्रेत 58 भक्तांचा ‘अग्निपरीक्षा” देणारा नवस‎ – Ahilyanagar News

अंगावर तेल, डोईवर धगधगते निखारे; कौठवाडीत घुमला ‘हुई..हुई..’चा नाद:  बिरोबा यात्रेत 58 भक्तांचा ‘अग्निपरीक्षा” देणारा नवस‎ – Ahilyanagar News


सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या दुर्गम कौठवाडीत रविवारी आदिम संस्कृतीचा अलौकिक सोहळा पार पडला. बिरोबा देवाच्या यात्रेत ५८ भाविकांनी डोक्यावर धगधगते ‘पेटते कठे’ (घागरी) घेऊन, ‘हुई..हुई..’ च्या लयीत मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. उकळते तेल अंगावर ओघळत असतान

.

डोक्यावर पेटते कठे घेऊन त्यात वारंवार खाद्यतेल ओतून व ते अंगावरून खाली शरिरावर ओघळून संपूर्णतः तेलकट झालेले भक्तांचे उघडेबंब शरीर व डोक्यावर नवसाचे धगधगते कठे हा प्रकार चमत्कारिक होता. भाविकांनी पेटते कठे डोक्यावर घेऊन बिरोबा मंदिराला प्रदक्षिणा घालून नवसपूर्ती केली.

ही थरारक परंपरा पाहण्यासाठी केवळ राज्यभरातूनच नव्हे, तर परदेशातूनही पर्यटक कौठवाडीत दाखल झाले होते. हा अलौकिक क्षण त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपला. आधुनिक युगातही आदिवासी समाज आपली संस्कृती आणि निसर्ग दैवतांवरील श्रद्धा जपून आहे, याचे जिवंत उदाहरण म्हणजे ही यात्रा. हिंदू महादेव कोळी समाजातील भाविक पुणे, ठाणे, नाशिक आणि नगर जिल्ह्यातून येथे दाखल झाले होते.

“कठ्याची जत्रा’ म्हणून ओळखला जाणारा हा सोहळा म्हणजे मानवी इच्छाशक्ती आणि श्रद्धेचा अद्भुत संगम ठरला. कौठवाडीचे माजी सरपंच सुरेश भांगरे, दत्तात्रय भोईर, वसंत भांगरे, दत्तात्रय भांगरे, निवृत्ती भांगरे, नितीन धराडे, मधुकर कोंडार, किसन भांगरे, भाऊराव भांगरे, सावळेराम भांगरे, देवराम भांगरे, बाळू घोडे आदींसह शेकडो भाविकांनी रविवारी बिरोबाचा जयघोष करीत रात्र जागवली. बिरोबाच्या पूजेचा मान पारंपरिक पद्धतीने भोईर घराण्याकडे होता.

भाविकांकडून रात्रभर सुरू होता बिरोबाचा जयघोष यात्रेत सर्वप्रथम मंदिरासमोरील दीपमाळ दीप प्रज्वलन करून सजविण्यात येते. मंदिर व परिसरातून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. यात्रेत प्रथम मान असलेली बिरोबाची मानाची काठी मिरवणूक काढून नाचवण्यात आली. देवाचे नाव घेत घुमणारे वारे निघाले. प्रथम मानाचा वारा (कठाधारी) मंदिरात प्रवेश करता झाला. त्यापाठोपाठ इतर वारे मंदिरात सोडले. नवसाचे ५८ कठे प्रदक्षिणा घालण्यास सज्ज झाले. यात्रा रात्रभर चालली. पारंपरिक वाद्यसंगीतावर वाजतगाजत ग्रामदैवत श्री बिरोबा मंदिरा भोवती कठे डोक्यावर घेऊन ठराविक ताल धरून हुई हुई हुई च्या लयीत नाचत नाचत प्रदक्षिणा घालून नवस फेडले. मंदिर गाभाऱ्यापासून सुरू झालेली मिरवणूक पुन्हा बिरोबा मंदिरासमोरच आली. मंदिरात घंटानाद करण्यात आला.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp