
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदी शिवराय कुळकर्णी यांची चौथ्यांदा निवड झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी त्यांच्या पुनर्निवडीची घोषणा केली. कुळकर्णी यांची सलग चौथ्यांदा या पदावर निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना कुळकर्णी म्हणाले, ‘पक्षाची बाजू योग्यरीतीने मांडण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन. तसेच, भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी आणि विजयासाठी कार्यरत राहण्यासाठी मी कटिबद्ध आहे.’ आजवरच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब करत सलग चौथ्यांदा प्रवक्तेपदी निवड केल्याबद्दल कुळकर्णी यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रदेश सरचिटणीस आणि अमरावतीचे प्रभारी आमदार संजय कुटे तसेच भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन आणि इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांप्रतीही कृतज्ञता व्यक्त केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






