digital products downloads

अमेरिका आता स्वतःच ‘नरक’ बनलीये: डोनाल्ड ट्रम्प यांच्या हॉटेलवरील गोळीबारानंतर प्रियंका चतुर्वेदींचा बोचरा टोला, नेमके काय म्हणाल्या? – Mumbai News

अमेरिका आता स्वतःच ‘नरक’ बनलीये:  डोनाल्ड ट्रम्प यांच्या हॉटेलवरील गोळीबारानंतर प्रियंका चतुर्वेदींचा बोचरा टोला, नेमके काय म्हणाल्या? – Mumbai News



अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मुक्कामाला असलेल्या वॉशिंग्टन डीसी येथील हिल्टन हॉटेलमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडली असून, यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ‘व्हाईट हाऊस करस्पाँडेंट्स डिनर’साठी ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया हॉटेलमध्ये उपस्थित असतानाच बॉलरुमच्या वरच्या मजल्यावर हा गोळीबार झाला. या गोळीबार प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करत म्हटले की, वॉशिंग्टन डी.सी. येथील ‘व्हाइट हाउस करस्पॉन्डन्ट्स डिनर’ कार्यक्रमातून काही चिंताजनक दृश्ये आणि गोळीबाराचे आवाज कैद करणारे व्हिडीओ समोर आले आहेत. जग इतक्या वेगाने बदलत आहे की हे बदल समजून घेणेच कठीण झाले आहे. त्यानंतर पुन्हा एक ट्विट करत प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, अमेरिकेतील बंदुकांची समस्या अत्यंत गंभीर आहे. हा असा एक मुद्दा आहे जो बंदुकांसंबंधी एखादी घटना घडल्यानंतर दरवर्षी चर्चेत येतो.बंदूक हिंसाचाराचा सामना करण्याच्या बाबतीत, अमेरिका स्वतःच प्रभावीपणे एक ‘नरक’ बनली आहे, असे म्हणत त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला नरक म्हणल्याच्या विधानावर टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत गोळीबार प्रकरणावर चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प आणि उपराष्ट्रपती हे वॉशिंग्टन डीसीमधील घटनेनंतर सुरक्षित आहेत, हे जाणून समाधान वाटले. मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतो. लोकशाहीत हिंसेला कोणतेही स्थान नाही आणि अशा कृत्यांचा पूर्णपणे निषेध केला पाहिजे, असे मोदी यांनी म्हटले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp