
वारंवार वादग्रस्त विधाने करून चर्चेत येणाऱ्या जैन मुनी नीलेशचंद्र यांनी यावेळी थेट मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांवर टीका केली आहे. भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नसता तर हिंदूंच्या डोक्यावर भगवी टोपी राहिली नसती. तुमच्या हातातील काठी ही गांधींची नव्हे तर संघाची आहे. ही काठी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना मारणारी आहे, असे ते म्हणालेत. ठाण्याच्या भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे मंगळवारी एक हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात बोलताना जैन मुनी नीलेशचंद्र यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधताना मुस्लिम धर्मियांविरोधातही वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, फक्त टोपी घालणारा व टिळा लावणारा हिंदू नाही. तो कोठ्यावर बसल्यासारखा आहे. मनोज जरांगे पाटलांनी माझ्यावर मुनीचे मुनीर करून टाकण्याची टीका केली. पण तुम्ही जनता जाणता. तुमचे हिंदूत्व काहींच्या … टाका. भाजप सोडून द्या, पण ते आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी करतात. अरे बाबा, आरएसएस नसती तर भारतात हिंदूंच्या डोक्यावर भगवी टोपी नसती. तुमच्या हातात असणारी काठी गांधींची नाही तर आरएसएसची आहे. गांधींची काठी मुस्लिमांना साथ देणारी होती. पण ही काठी संघाची आहे. ती भारताचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना मारणारी आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची नाटके पाहता व घरी जाऊन झोपता. आता तुमच्या घरातच ओरिजनल छावा पैदा करा. तेव्हा मुस्लिमांची वाट लागेल. त्याशिवाय त्यांचे काहीही होणार नाही, असे नीलेशचंद्र म्हणाले. जैन समाज सनातन परंपरेतीलच नीलेशचंद्र यांनी यावेळी आपण आपल्यावर गुन्हा दाखल झाला तरी घाबरणार नसल्याचेही स्पष्ट केले. माझ्यावर केस दाखल झाली तरी मी घाबरणार नाही. आमचा समाज एसी हॉलमध्ये बसला आहे. पण मी फक्त सनातन धर्मासाठी येथे आलो आहे. जैन समाज हा वेगळा नाही, तर तो ही सनातन परंपरेतीलच आहे. आपण सर्व आहोत. आपल्याकडील तलवारीला धार लावून ठेवा. संकल्प करा. दुर्गाडी किल्ल्यावरील आई भवानीची शपथ घेऊन येतील अतिक्रमण काढण्याचा संकल्प करू. अतिक्रमण काढले नाही तर … त्यांना तिथेच गाडू, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. जैन मुनीचे यापूर्वीही अनेक वादग्रस्त विधाने उल्लेखनीय बाब म्हणजे नीलेशचंद्र यांनी वादग्रस्त विधान करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यांनी काही दिवसांपूर्वी मंत्री नीतेश राणे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. तसेच ते लवकरच मुख्यमंत्री होतील असे भाकितही वर्तवले होते. पण त्यानंतर नीतेश राणेंनी आपल्याला ही तुलना मान्य नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता जैन मुनींनी पुन्हा वादग्रस्त विधान केल्यामुळे त्याचे काय पडसाद उमटतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






