digital products downloads

अधिकाऱ्याची दुचाकीवर जाऊन एमपी- महाराष्ट्र सीमेवरील वाळू घाटावर धाड: पोकलॅन्डसह दोन वाहन केली जप्त; कठोर कारवाईचे संकेत‎ – Amravati News

अधिकाऱ्याची दुचाकीवर जाऊन एमपी- महाराष्ट्र सीमेवरील वाळू घाटावर धाड:  पोकलॅन्डसह दोन वाहन केली जप्त; कठोर कारवाईचे संकेत‎ – Amravati News



वाळूतस्करांना कारवाईची कुणकुण लागू नये म्हणून धारणी येथे कार्यरत असलेले प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी सिध्दार्थ शुक्ला यांनी थेट दुचाकीवर स्वार होऊन वाळू घाट गाठला. यावेळी त्यांच्यासोबत केवळ तीन महसूल कर्मचारी होते. आयएएस शुक्ला यांनी महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवरील सोनाबर्डी गावानजीक तापी नदीत सुरू असलेल्या वाळू घाटावर गुरूवारी २४ एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता धाड टाकून पोकलॅन्डसह दोन वाहन केली जप्त केली. ही कारवाई मध्यरात्री साडेबारा ते शुक्रवारी पहाटे सहा वाजेपर्यंत सुरू होती. सोनाबर्डी येथील तापी नदीवरील रेती घाटावर सुरू असलेल्या अवैध उत्खननावर झालेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनाबर्डी घाटावर मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी शुक्ला यांच्याकडे आल्या होत्या. मात्र, या कारवाईची कुणालाही चाहूल लागू न देता शुक्ला यांनी अत्यंत गुप्तपणे योजना आखली. गुरुवारी मध्यरात्री सुमारे १२ वाजता दोन ते तीन कर्मचाऱ्यांसह दुचाकीवरून त्यांनी थेट घाटावर प्रवेश केला आणि सुरू असलेला अवैध उपसा पकडला. अचानक अधिकाऱ्यांची उपस्थिती पाहताच मजूर आणि यंत्र चालकांनी घटनास्थळावरून पळ काढला. काहींनी अंधाराचा फायदा घेत नदीकाठ सोडला, तर काहींनी वाहनांसह पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांनी चपळाईने पाठलाग करत एक टिप्पर आणि डम्पर वाहन ताब्यात घेतले. याशिवाय, जवळील शेतात लपवून ठेवलेले पोकलॅंड मशीनही शोधून काढत जप्त करण्यात आले. या कारवाईचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले असून, परवानगीपेक्षा अधिक उत्खनन झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित घाटमालकांवर कठोर कारवाईसह घाट बंद करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या कारवाईमध्ये महसूलचे मोजके कर्मचारी तसेच स्थानिक पोलिसांचा सहभाग होता. तालुक्यात कुठेही अवैध रेती उत्खनन किंवा तस्करी आढळल्यास तत्काळ कठोर कारवाई केली जाईल. नियम मोडणाऱ्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही. अशा धडक कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहतील. या कारवाईची सखोल चौकशी सुरू केली आहे. यामध्ये दोषी आढणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई केली जाणार आहे. – सिद्धार्थ शुक्ला, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, धारणी. घाटावरील वाहतूकीसाठी छुप्या मार्गाचा होतो वापर या घाटावरुन वाळू वाहनांची वाहतूक करण्यासाठी एक छुपा मार्ग तयार करण्यात आला आहे. हा मार्ग सर्वसामान्यत: कोणालाही माहीत नाही. या मार्गाने वाहनांची वर्दळ सुरू असल्याचे दिसतसुध्दा नाही. कारवाईदरम्यान पोकलॅन्ड मशिनसुध्दा याच मार्गावर लपवून ठेवण्यात आली असल्याचे आमच्या निदर्शनात आले आहे. तसेच घाटाला लागूनच दुसऱ्या बाजूने मध्यप्रदेश आहे. त्यामुळे काही वाहनं एमपीच्या दिशेने पसार झाल्याचाही अंदाज आयएएस सिध्दार्थ शुक्ला यांनी वर्तवला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp