digital products downloads

भोंदू खरात प्रकरणामुळे आणखी एका पदाधिकाऱ्याचा राजीनामा: राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे पदावरून पायउतार – Mumbai News

भोंदू खरात प्रकरणामुळे आणखी एका पदाधिकाऱ्याचा राजीनामा:  राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे पदावरून पायउतार – Mumbai News



नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या आर्थिक साम्राज्याची पाळेमुळे खणून काढली जात असतानाच, राज्याच्या सहकार क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. समता पतसंस्थेचे संस्थापक आणि ज्येष्ठ सहकार नेते काका कोयटे यांनी ‘महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन’च्या अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. अशोक खरात याच्याशी असलेल्या आर्थिक संबंधांच्या आरोपांमुळे आणि पतसंस्थेच्या सभासदांकडून होत असलेल्या वाढत्या मागणीमुळे कोयटे यांनी हे पाऊल उचलल्याचे समजते. अशोक खरात याच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू असताना ‘समता पतसंस्थे’तील धक्कादायक माहिती समोर आली होती. खरात याने या पतसंस्थेत तब्बल १०० हून अधिक खात्यांवर ‘नॉमिनी’ (वारस) म्हणून आपले नाव नोंदवले होते. या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांची संशयास्पद देवाणघेवाण झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. विशेष म्हणजे, यातील अनेक खाती कोव्हिड काळात ऑनलाईन पद्धतीने उघडण्यात आली होती. या आर्थिक लागेबांध्यांमुळे काका कोयटे हे खरातचे ‘भक्त’ असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. “मी कोणाचाही भक्त नाही” – कोयटे यांचे स्पष्टीकरण राजीनामा देण्यापूर्वी काका कोयटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “माझा कोणत्याही भोंदू बाबाशी संबंध नाही आणि मी खरातचा भक्तही नाही. नाशिकच्या एका सार्वजनिक कार्यक्रमात तो उपस्थित होता, इतकाच काय तो संबंध. आमच्या पतसंस्थेत सर्व नियमांचे पालन करूनच खाती उघडण्यात आली आहेत. ज्या खातेदारांनी तक्रार केली आहे, त्यांचे सर्व पुरावे आम्ही पोलिसांना द्यायला तयार आहोत,” असे त्यांनी नमूद केले. मात्र, राज्यातील १५ हजार पतसंस्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फेडरेशनच्या प्रतिमेला तडा जाऊ नये, म्हणून त्यांनी अध्यक्षपदाचा त्याग केला आहे. रूपाली चाकणकरांनाही द्यावा लागला राजीनामा दरम्यान, भोंदूबाबा अशोक खरातमुळे रूपाली चाकणकर यांना देखील आपल्या पदांचा राजीनामा द्यावा लागला आहे. अशोक खरातचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रूपाली चाकणकर या अशोक खरातचे पाय धुतानाचे व्हिडिओ समोर आले होते. तसेच अशोक खरातचे ईशान्येश्वर ट्रस्टवर चाकणकर या उपाध्यक्ष होत्या. हा सर्व प्रकार समोर येताच विरोधकांकडून रूपाली चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. त्यापार्श्वभूमीवर रूपाली चाकणकर यांनी आधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरही पाणी सोडावे लागले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp