digital products downloads

तिसऱ्यांदा मुलाखती घेऊनही नियुक्ती आदेश रखडले: आशा स्वयंसेविका पदासाठी निवड झालेल्या महिलांचे उपोषण – Amravati News

तिसऱ्यांदा मुलाखती घेऊनही नियुक्ती आदेश रखडले:  आशा स्वयंसेविका पदासाठी निवड झालेल्या महिलांचे उपोषण – Amravati News



अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आशा स्वयंसेविका पदासाठी तिसऱ्यांदा मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, अद्याप नियुक्ती आदेश न मिळाल्याने निवड झालेल्या तीन महिला उमेदवारांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यामध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे. या आंदोलनाचा आज (बुधवार) दुसरा दिवस होता, परंतु अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. उपोषणात गर्भवती महिला नीता राहुल उके, रेश्मा मनीष हरणे आणि मिनल सम्यक रंगारी यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, नीता उके आणि रेश्मा हरणे यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे पतीही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. अमरावतीजवळील वलगाव येथे आशा स्वयंसेविकेच्या तीन जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवून प्रक्रिया राबवण्यात आली होती. मात्र, निवडीवर शिक्कामोर्तब होण्यापूर्वीच तेथील सरपंचांनी प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याने आरोग्य विभागाने ती रद्द केली. त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश असलेली समिती तयार करून दुसऱ्यांदा मुलाखती घेण्यात आल्या. परंतु, यावेळीही यादी जाहीर करण्यापूर्वीच ती ‘लीक’ झाल्याने संबंधित समितीवर ठपका ठेवून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ही प्रक्रियाही रद्द केली. पुढे एक नवीन समिती तयार करून पुन्हा मुलाखती आयोजित करण्यात आल्या. यावेळी तीन जागांसाठी तब्बल ४४ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. मागील अनुभवावरून या प्रक्रियेचे व्हिडीओ शूटिंगही करण्यात आले. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून रेश्मा मनीष हरणे, नीता राहुल उके आणि मिनल सम्यक रंगारी या तिघींची निवड झाल्याची अधिकृत यादीही घोषित करण्यात आली. दरम्यान, दुसऱ्यांदा झालेल्या मुलाखतीची यादी ‘लीक’ झाल्याने त्यात ज्यांची निवड झाली होती, त्यांनी आक्षेप घेऊन नव्याने प्रक्रिया राबवण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे प्रशासनाने संबंधित उमेदवारांचे नियुक्ती आदेश थांबवले आहेत. याच मुद्द्यावरून निवड झालेल्या तिन्ही महिलांनी उपोषण सुरू केले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp