digital products downloads

मतदानासाठी कारागीर प. बंगालला: यंदा ‘कर्तव्य’ नक्षीदार दागिन्यांविना!, अनेक व्यावसायिकांना ऑर्डर्स रद्द करावे लागणार‎ – Ahilyanagar News

मतदानासाठी कारागीर प. बंगालला:  यंदा ‘कर्तव्य’ नक्षीदार दागिन्यांविना!, अनेक व्यावसायिकांना ऑर्डर्स रद्द करावे लागणार‎ – Ahilyanagar News



राज्यात सध्या लग्नसराईचा धूमधडाका सुरू आहे, मात्र वधू-वरांच्या अंगावर चढणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांची चकाकी यंदा फिकी पडण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दागिन्यांवर कलाकुसरीचे नक्षीकाम करणारे पश्चिम बंगालचे महाराष्ट्रातील तब्बल १६ लाख कारागीर मतदानासाठी आपल्या गावी परतले आहेत. याचा मोठा फटका अहिल्यानगरमधील सराफ बाजारालाही बसला असून, नक्षीकाम केलेल्या दागिन्यांची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. कोट्यवधींच्या आगाऊ ऑर्डर्स रद्द करण्याची वेळ आता सराफ व्यावसायिकांवर आली आहे. पश्चिम बंगालमध्ये २३ एप्रिल रोजी मतदान होत आहे. हे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी २० एप्रिलपासूनच कारागिरांची रीघ लागली आहे. मुंबईतील अनेक कारागिरांनी विमानाने, तर इतरांनी विशेष रेल्वे आणि लक्झरी बसद्वारे कोलकाता गाठले आहे. अहिल्यानगरसह मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथून हे कारागीर रवाना झाल्याने येथील सुवर्ण कारखाने “ओस’ पडले आहेत. हे कारागीर ४ मे नंतर परततील असे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्ष किती जण कामावर रुजू होतील, याबद्दल सुवर्ण पेढ्यांमध्ये मोठा संभ्रम आहे. { नक्षीकाम: सोन्याच्या तारांपासून बनवले जाणारे नाजूक आणि पारंपरिक दागिने. { कास्टिंग ज्वेलरी: साच्यातून तयार होणारे आधुनिक दागिने. {टर्किश आणि राजकोट: सध्या ट्रेंडमध्ये असलेले हे दागिने वेळेत मिळणे आता कठीण आहे. { पारंपरिक हार व झुमके: हाताने तयार केल्या जाणाऱ्या दागिन्यांचे फिनिशिंग काम रेंगाळले आहे. सुवर्ण व्यावसासिकांना फटका बसणार ^”पश्चिम बंगालचे सर्वाधिक कारागीर सोन्याच्या व्यवसायात आहेत. हे कारागीर मतदानासाठी मालकांना न सांगताच निघून गेले आहेत. लग्नसराईच्या ऑर्डर्स आधीच घेतल्या गेल्या आहेत, पण कारागीर नसल्याने ग्राहकांना वेळेत दागिने देणे आता अशक्य आहे. अनेक व्यावसायिकांना ऑर्डर्स रद्द कराव्या लागतील, ज्याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे.’ – संतोष वर्मा, राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय सुवर्णकार समाज.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp