digital products downloads

सुके बोंबील विकणाऱ्या भाेंदूबाबा मनाेहरने उभारला 27 एकरांत मठ: साेलापूरच्या उंदरगावात व घाेटीमध्ये उभारले आलिशान मठ – Solapur News

सुके बोंबील विकणाऱ्या भाेंदूबाबा मनाेहरने उभारला 27 एकरांत मठ:  साेलापूरच्या उंदरगावात व घाेटीमध्ये उभारले आलिशान मठ – Solapur News



बलात्कार आणि फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्यात ५ महिने जेलची हवा खाऊन जामिनावर सुटलेला भोंदूबाबा मनोहर भोसले ऊर्फ ‘मनोहर मामा’ पुन्हा एकदा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. व्यवसायात भरभराटीचे आमिष दाखवून ५० हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी त्याला पुण्यातून (मांजरी) अटक केली असून माढा न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. स्वतःवर ‘बाळूमामा प्रसन्न’ असल्याचा दावा करत या भोंदूने गेल्या १० वर्षांत फसवणुकीचे मोठे जाळे विणले. करमाळा व कर्नाटकातील (गाणगापूर) मठात अमावास्या-पौर्णिमेच्या दरबारासाठी भाविकांकडून तो थेट ११ हजारांची पावती फाडत होता. तर, नवी मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये ‘व्हीआयपी’ दरबारासाठी ५१ हजार प्रवेश फी आकारली होती, अशी माहिती समोर आली. नेत्यांचा आश्रय भोंदूबाबाच्या दरबारात राजकीय नेते आणि बड्या व्यावसायिकांचीही उठबस असायची. सध्या त्याचे आलिशान गाड्या आणि नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय. क्राईम कुंडली: भोंदू मनोहरवर दाखल गुन्हे २०२१ (बारामती) : कॅन्सर बरा करण्याच्या नावाखाली २ लाख ५१ हजारांची फसवणूक (जादुटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा). २०२१ (करमाळा) : टीव्ही मालिकेत काम देण्याच्या आमिषाने महिलेवर अत्याचार आणि आर्थिक लूट. २०२६ (कुर्डुवाडी) : व्यवसायात भरभराटीसाठी ५० हजारांचा गंडा (सध्या याच गुन्ह्यात अटक). याशिवाय सातारा (लोणंद) व पुणे (दौंड) पोलिसांतही त्याच्याविरोधात अनेक तक्रारी दाखल आहेत. दिव्य मराठी इनसाइड बोंबील विक्री ते २७ एकरांचा आश्रम : मूळचा इंदापूर तालुक्यातील (लासुर्णे) असलेला मनोहर भोसले डीएडमध्ये नापास झाल्यावर सुके बोंबील विकून घर चालवत होता. काही काळ बेपत्ता राहिल्यानंतर तो गावात परतला व त्याने ‘मनोहर मामा’ हे नाव धारण करून भोंदूगिरी सुरू केली. याच पैशातून त्याने उंदरगाव, घोटी येथे थेट २७ एकरात आश्रम थाटले आणि तो कोट्यधीश बनला. पोलिस आता या संपत्तीच्या अँगलनेही तपास करत आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp