digital products downloads

बागेश्वर बाबाच्या वक्तव्याविरोधात नांदगाव, चांदूरबाजारमध्ये आंदोलन: छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप; कडक कारवाईची मागणी – Amravati News

बागेश्वर बाबाच्या वक्तव्याविरोधात नांदगाव, चांदूरबाजारमध्ये आंदोलन:  छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप; कडक कारवाईची मागणी – Amravati News



धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ ‘बागेश्वर बाबा’ यांच्या कथित अवमानकारक विधानांविरोधात काँग्रेसने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून नांदगाव खंडेश्वर, चांदूरबाजार आणि अंजनगाव सुर्जी येथे सोमवारी आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी तहसील कार्यालयांवर धडक देत बाबावर तात्काळ आणि कडक कायदेशीर कारवाईची मागणी केली. नांदगाव खंडेश्वर येथील आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव परिक्षित जगताप यांनी केले. यावेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष समीर दहातोंडे, युवक काँग्रेस अध्यक्ष दीपक भगत, शहर काँग्रेस अध्यक्ष अमोल धवसे, माजी तालुका अध्यक्ष निशांत जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. चांदूरबाजार येथेही बागेश्वर बाबाच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. ग्रामीण काँग्रेसने २७ एप्रिल रोजी (सोमवारी) शिवाजी महाराज चौकात तीव्र आंदोलन केले. धीरेंद्र शास्त्रीवर गुन्हा दाखल करून महाराष्ट्रात कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात ग्रामीण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर देशमुख, विधानसभा अध्यक्ष निलेश डांगे, नगरसेवक अल्तमश सौदागर, युवक तालुकाध्यक्ष श्रेयस बर्वे, सरपंच मनोज देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. बागेश्वर बाबा यांनी यापूर्वीही वादग्रस्त विधाने केली आहेत. १७ मार्च २०२३ रोजी त्यांनी संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होते, ज्यामुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या होत्या. महापुरुषांबद्दल वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून समाजात संभ्रम आणि तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp