
छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाजनगर ओएसिस चौकात ‘गोदा ते नर्मदा – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा २०२६’ चे उत्साहात स्वागत करण्यात आले. जलसंवर्धनाबाबत जनजागृती करणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त ही ऐतिहासिक जलयात्रा आयोजित करण्यात आली आहे. श्रीक्षेत्र चोंडी, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून सुरू झालेली ही यात्रा महेश्वरपर्यंत प्रवास करणार आहे. बजाजनगर येथील स्वागतावेळी यात्रा रथाचे आणि मंगल कलशाचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती सचिन गरड यांच्या वतीने या भव्य स्वागताचे आयोजन करण्यात आले होते. आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यातून जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित होते. ही जलयात्रा त्यांच्या कार्याला उजाळा देऊन समाजात सकारात्मक बदल घडवेल आणि जनतेमध्ये जलसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करेल. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, माजी आमदार सदाभाऊ खोत, माजी खासदार रामराव वडकुते, भाजपा जिल्हा अध्यक्ष संजय खंबायते आणि छत्रपती संभाजीनगर भाजपा पश्चिम मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






