digital products downloads

भांडारकर मंदिर, सीओईपी विद्यापीठात सामंजस्य करार: प्राचीन ज्ञान युवा पिढीत रुजवण्यासाठी प्रयत्न आवश्यक – प्रदीप रावत – Pune News

भांडारकर मंदिर, सीओईपी विद्यापीठात सामंजस्य करार:  प्राचीन ज्ञान युवा पिढीत रुजवण्यासाठी प्रयत्न आवश्यक – प्रदीप रावत – Pune News



भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर (BORI) आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात भारत इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष आणि भांडारकर संस्थेचे विश्वस्त प्रदीप रावत यांनी भारतीय ज्ञानपरंपरा युवा पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज व्यक्त केली. ही ज्ञानपरंपरा केवळ भूतकाळापुरती मर्यादित न राहता, वर्तमानात आणि तरुण पिढीच्या मनात रुजवण्यासाठी प्रयत्न आवश्यक असल्याचे ते म्हणाले. हा कार्यक्रम भांडारकर संस्थेच्या फिरोदिया सभागृहात पार पडला. रावत यांनी विश्वास व्यक्त केला की, भांडारकर संस्थेचे ‘भारतविद्या’ हे डिजिटल व्यासपीठ तरुण पिढीला या समृद्ध वारशाशी जोडण्यास मदत करेल. नव्या शैक्षणिक धोरणानुसार, पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञान प्रणाली (IKS) चा २ क्रेडिटचा अभ्यासक्रम अनिवार्य करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम भांडारकर संस्थेने विकसित केला असून, तो ‘भारतविद्या’ डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे विविध विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना उपलब्ध करून दिला जात आहे. या सामंजस्य करारानुसार, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या प्रथम वर्षातील १६०० हून अधिक विद्यार्थ्यांना हा ऑनलाइन अभ्यासक्रम दिला जाईल. यातील एका वर्षाची विद्यार्थ्यांची फी परिमल अँड प्रमोद चौधरी फाऊंडेशनतर्फे भरण्यात येणार आहे. तसेच, नजीकच्या भविष्यात भांडारकर संस्था आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ एकत्र येऊन आणखी कोणत्या क्षेत्रांत काम करू शकतील, यावर दोन्ही संस्थांमधील तज्ञ विचारमंथन करणार आहेत. यावेळी ज्येष्ठ मूर्तिशास्त्रतज्ज्ञ गो. बं. देगलूरकर, परिमल अँड प्रमोद चौधरी फाऊंडेशनच्या संस्थापिका परिमल चौधरी, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील भिरूड, सीओईपीचे सहायक अधिष्ठाता डॉ. प्रशांत बारटक्के, अप्लाइड सायन्स विभागाचे प्रमुख डॉ. महेश शिंदीकर, एनइपी व आयकेएसच्या समन्वयक डॉ. प्रीतम सेलमोकर, भांडारकर संस्थेचे विश्वस्त भरत फाटक, अॅकेडेमिक कौन्सिलचे प्रमुख डॉ. प्रदीप आपटे, भारतविद्या डिजिटल प्लॅटफॉर्म प्रकल्पाच्या प्रमुख व महाभारत कल्चरल इंडेक्सच्या कार्यकारी संपादक डॉ. गौरी मोघे आणि इंडी हेरीटेजचे संस्थापक तुषार जोशी उपस्थित होते. रावत यांनी पुढे सांगितले की, वर्तमानाचे भान सोडून केवळ भूतकाळात रमण्याऐवजी, समृद्ध गतकाळाचा धागा वर्तमानाशी नेमका कसा जोडता येईल, या दृष्टीने नव्या शैक्षणिक धोरणात बदल करण्यात आले आहेत. यातून युवा पिढी आपल्या समृद्ध वारशाशी परिचित होईल आणि वर्तमानाच्या आरशात आपल्याला समृद्ध भूतकाळाचे यथायोग्य प्रतिबिंब पाहता येईल. डॉ. गौरी मोघे म्हणाल्या की, भारतविद्या डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी कंटेंट तयार करत असताना या विषयाबद्दल जागरूक असण्याऱ्या संस्था व व्यक्तींकडून अर्थसहाय्य मिळते. परंतु, संधोधनाचा भक्कम पायावर भांडारकर संस्थेने विकसित केलेल्या आयकेएसच्या २ क्रेडिटच्या या ऑनलाईन कोर्सचा फायदा थेट विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी प्रथमच परिमल अँड प्रमोद चौधरी फाऊंडेशने निधी उपलब्ध करून दिला. हे एक पथदर्शी व स्वागतार्ह पाउल आहे. यातून प्रेरणा घेवून इतर संस्था देखील पुढे येवून हा कोर्स वेगवेगळ्या महाविद्यालयातील किंवा विद्यापीठातील विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी मदत करतील, अशी आम्हाला आशा आहे. परिमल चौधरी म्हणाल्या, हजारो वर्षांचा ज्ञानवारसा भांडारकर, डेक्कन कॉलेजसारख्या संस्थांनी जपला आहे. सीओईपीसारखी प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था गुणवत्तापूर्ण वर्तमानकालीन तंत्रस्नेही अभ्यासक्रमाच्या माध्यमातून युवा पिढी घडवण्याचे कार्य करत आहे. युवा पिढीसाठी वारसा जतन व संशोधन करणारी संस्था आणि तंत्रस्नेही शैक्षणिक विद्यापीठ एकत्र आले, तर आपल्या ज्ञानपरंपरा, संस्कृतीकडे पाश्चात्त्य नजरेने न पाहता, भारतीय दृष्टीने पाहण्यास विद्यार्थ्यांना साह्य होईल, यासाठी फाऊंडेशनने सहकार्य केले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp