digital products downloads

2029 ला मुख्यमंत्री ठरवण्यात माझा सिंहाचा वाटा असेल: पराभवानंतरही अभिजित बिचुकलेंचा ‘कॉन्फिडंस’, म्हणाले- शर्यत अजून संपलेली नाही – Pune News

2029 ला मुख्यमंत्री ठरवण्यात माझा सिंहाचा वाटा असेल:  पराभवानंतरही अभिजित बिचुकलेंचा ‘कॉन्फिडंस’, म्हणाले- शर्यत अजून संपलेली नाही – Pune News


बारामती पोटनिवडणुकीच्या आज जाहीर झालेल्या निकालात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक विजय मिळवत आपला गड यशस्वीपणे राखला असून, या निवडणुकीत नशीब आजमावणाऱ्या 23 उमेदवारांपैकी चर्चेत असलेले अभिजित बिचुकले यांना मात्र पुन्हा एकदा पराभव

.

अभिजीत बिचुकले म्हणाले, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. येणार्‍या काळात महाराष्ट्र राज्याचे भवितव्य ठरवण्याचा, संपूर्ण लोकशाहीच्या माध्यमातून अधिकार मी मा‍झ्या जवळ घेणार आहे. 2029 ची जी काही निवडणूक असेल, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री ठरवताना, माझी भूमिका सिंहाचा वाटा असेल. मला मतं कमी पडत आहेत, याचं कारण लोक अजून जागृत झालेली नाही. आजच्या निवडणुकांमध्ये पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे आमच्यासारखे प्रामाणिक आणि सर्वसामान्य नेते मागे पडतात. यासाठी लोकांमध्ये जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे.

मी जर बारामतीत प्रचार केला असता, तर निकाल निश्चितच वेगळा लागला असता. मात्र, अजित पवार यांना श्रध्दांजली म्हणून मी त्या ठिकाणी गेलो सुद्धा नाही,’ असे अभिजीत बिचुकले यांनी स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले, माझे दादांनी कधी वाईट नाही केले. ना कधी भलेही केले. दादांवर माझे प्रेम होते. दादांचेही माझ्यावर प्रेम होते. प्रेमापोटी प्रचार केला नाही, दादा मला कविराज म्हणायचे. आतापर्यंत मी 12हून अधिक निवडणूक लढवली. मी कधीही विशिष्ट जातीबद्दल बोललो नाही. मी संपूर्ण महाराष्ट्राच्या धर्माला जाणतो, असेही ते यावेळी म्हणाले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp