digital products downloads

एएफएमसीमध्ये ‘इल्यूमिनाटी 2026’ संशोधन परिषद संपन्न: डॉ. प्रकाश आमटे, अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची प्रमुख उपस्थिती – Pune News

एएफएमसीमध्ये ‘इल्यूमिनाटी 2026’ संशोधन परिषद संपन्न:  डॉ. प्रकाश आमटे, अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची प्रमुख उपस्थिती – Pune News

पुण्यातील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (एएफएमसी) मध्ये तीन दिवसीय ‘इल्यूमिनाटी २०२६’ पदवीपूर्व संशोधन परिषद यशस्वीपणे पार पडली. ‘इग्नाइटिंग आयडियाज, इल्युमिनेटिंग टुमारो’ या संकल्पनेवर आधारित या परिषदेचे आयोजन ‘स्टुडंट सायंटिफिक सोसायटी’ने केले होते.

.

परिषदेच्या उद्घाटन आणि मार्गदर्शन सत्रासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे तसेच भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. आमटे यांनी आदिवासी आणि ग्रामीण भागातील आरोग्य सेवेतील आपले अनुभव सांगून विद्यार्थ्यांना समाजसेवेची प्रेरणा दिली. ग्रुप कॅप्टन शुक्ला यांनी अंतराळ क्षेत्रातील आव्हाने आणि वैद्यकीय क्षेत्रातील संधी यावर मार्गदर्शन केले.

तीन दिवस चाललेल्या या परिषदेत शोधनिबंध सादरीकरण, वैद्यकीय प्रश्नमंजुषा, हॅकाथॉन आणि २३ हून अधिक नाविन्यपूर्ण कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. ‘अविष्कार’ या व्यासपीठाद्वारे विद्यार्थ्यांनी नवीन वैद्यकीय उपकरणे आणि ‘एआय’ आधारित आरोग्य सेवा उपायांचे सादरीकरण केले. ३डी प्रिंटिंग, लॅप्रोस्कोपी सिम्युलेशन, रिसर्च प्रपोजल मेकिंग आणि ‘पॉईंट ऑफ केअर अल्ट्रासाऊंड’ यांसारख्या कार्यशाळा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवासाठी उपयुक्त ठरल्या.

या परिषदेचे मुख्य आकर्षण ‘मिशन मेडेव्हॅक: फ्रंटलाइन रिस्पॉन्स’ हे प्रात्यक्षिक ठरले. रणांगणावरील जखमी सैनिकांना तातडीने वैद्यकीय उपचार देऊन कसे बाहेर काढले जाते, याचे प्रत्यक्ष युद्धजन्य परिस्थितीतील प्रात्यक्षिक फील्ड हॉस्पिटलच्या माध्यमातून दाखवण्यात आले. सशस्त्र दलाची सज्जता आणि वैद्यकीय कौशल्याचे हे सादरीकरण पाहून उपस्थित प्रभावित झाले.

याव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांना ‘इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिन’च्या सहकार्याने विमान उड्डाण वैद्यकशास्त्राची माहिती मिळाली. एएफएमसी कॅम्पसमध्ये ‘हेरिटेज वॉक’चेही आयोजन करण्यात आले होते. शैक्षणिक सत्रांसोबतच ‘सिनॅस्थेशिया’ या कॅडेट बँडचे सादरीकरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिषदेची सांगता झाली. आयोजन समितीने सांगितले की, “भविष्यातील संशोधक डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्रातील नेते घडवणे हाच या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.”

एएफएमसीमध्ये 'इल्यूमिनाटी 2026' संशोधन परिषद संपन्न: डॉ. प्रकाश आमटे, अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची प्रमुख उपस्थिती - Pune News
doonited advertisement

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp