
लोणी काळभोर पोलिसांनी एका ६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला २४ तासांच्या आत अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून पोलिसांनी तातडीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव श्रीधर लिंबाजी कांबळे (वय ४६ वर्षे, रा. भीमनगर, थेऊर, ता. हवेली, जि. पुणे) असे आहे. ही घटना थेऊर येथील भीमनगर परिसरात घडली. पीडित ६ वर्षीय मुलगी घराच्या परिसरात खेळत असताना, आरोपी श्रीधर कांबळे याने तिला खाण्याचे आमिष दाखवून जवळ बोलावले. त्यानंतर त्याने तिच्याशी लैंगिक गैरवर्तन केले. या घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तात्काळ तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ७४ आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पोक्सो) २०१२ च्या कलम ८ व १२ नुसार गुन्हा दाखल केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी २४ तासांच्या आत तपास पूर्ण करून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सागर कवडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक स्मिता पाटील, स्नेहल राजे आणि तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर व त्यांच्या पथकाने ही कार्यवाही केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






