
देशात महिलांची संख्या सरासरी ५० टक्के असून सुशिक्षित महिलांचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. शासनाच्या सहकार्यामुळे आज मोठ्या उद्योगांप्रमाणेच गावपातळीवरील महिला बचत गटही छोटे-मोठे उद्योग यशस्वीपणे चालवत आहेत. पर्यायाने देशाच्या आर्थिक विकासात महिला उद्
.
जामनेर येथे स्टेट बँक ऑफ इंडिया (कृषी शाखा) तर्फे आयोजित महिला बचत गट मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मेळाव्यात आपल्या उद्योगातून आदर्श निर्माण करणाऱ्या आणि उत्कृष्ट व्यावसायिक कामगिरी करणाऱ्या काही बचत गटांच्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. या सन्मानामुळे उपस्थित इतर महिलांनाही उद्योग सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. तहसीलदार नानासाहेब आगळे आणि उपस्थित मान्यवरांनी जास्तीत जास्त महिलांनी शासकीय योजनांचा आणि बँक अर्थसाहाय्याचा लाभ घेऊन आपले उद्योग उभारणीचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन केले.
तीन कोटींच्या कर्जाचे वाटप जामनेर तालुक्यातील ७५ महिला बचत गटांना नव्याने उद्योग उभारणीसाठी स्टेट बँक कृषी शाखेतर्फे तीन कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आले. तर जामनेर येथील स्टेट बँकेत ईसीजी कॉर्नर या नावाने बचत गटांच्या महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यात आली.
स्टेट कृषी शाखेतर्फे आयोजित मेळाव्या प्रसंगी बँकेचे व्यवस्थापक युवराज चौधरी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अभियान व्यवस्थापक हरेश्वर भोई, आर्थिक समावेशक चंद्रकांत सोनवणे, ज्ञानेश्वर बाविस्कर, बदाम जाधव, कैलास गोपाळ शरद पाटील विशाल चौधरी, शाखा व्यवस्थापक गणेश दुर्गुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






