digital products downloads

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच: आयात महिला नेत्याला संधी? शायना एनसी यांचे नाव आघाडीवर – Mumbai News

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच:  आयात महिला नेत्याला संधी? शायना एनसी यांचे नाव आघाडीवर – Mumbai News



नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण भोवल्याने रूपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे सध्या हे अत्यंत महत्त्वाचे पद रिक्त आहे. महायुतीच्या सत्तावाटपात हे पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले असून, यासाठी पक्षात इच्छुकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत आहे. मात्र, पक्षातील निष्ठावंतांना डावलून या पदावर एखाद्या ‘आयात’ महिला नेत्याची वर्णी लागण्याची दाट शक्यता असून, यात शिवसेनेच्या शायना एनसी यांचे नाव अचानक समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत असलेल्या शायना एनसी यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची त्यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर, शायना एनसी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधणार असून, महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. निष्ठावंतांचा अपेक्षाभंग होणार? महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक दिग्गजांची नावे शर्यतीत होती. यामध्ये प्रतिभा शिंदे, डॉ. ज्योती मेटे, माजी पोलिस अधिकारी मीरा बोरवणकर आणि सुनेत्रा पवार यांच्या अत्यंत निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या वैशाली मोठे या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. तर वैशाली नागवडे, रूपाली ठोंबरे, प्रेरणा बलकवडे, सुरेखा ठाकरे आणि राजलक्ष्मी भोसले यांचीही नावे चर्चेत आहेत. मात्र, आता अचानक ‘आयात’ नेत्याचे नाव समोर आल्याने पक्षासाठी वर्षानुवर्षे राबणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. शायना एनसी यांची पुनर्वसनासाठी धडपड शायना एनसी यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी मुंबादेवी मतदारसंघातून नशीब आजमावले, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसच्या अमिन पटेल यांनी शायना एनसी यांना पराभूत केले होते. या पराभवानंतर राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या शायना यांनी राज्यसभा आणि विधान परिषदेसाठीही मोठे प्रयत्न केले. मात्र, विधान परिषदेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने त्या नाराज असल्याचे बोलले जात होते. अंतिम निर्णय सुनेत्रा पवारांच्या हातात आता महिला आयोगाच्या माध्यमातून शायना एनसी यांना राजकीय पुनर्वसन होणार का? आणि राष्ट्रवादीतील इतर निष्ठावंत इच्छुकांची समजूत कशी काढली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबतचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेच असणार आहे. अशोक खरात प्रकरणामुळे रूपाली चाकणकरांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांचे अशोक खरातसोबतचे काही फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी गंभीर आरोप केले होते. चाकणकर या खरातला आपला ‘गुरू’ मानत असल्याने त्यांनी यापूर्वीच्या काही प्रकरणांत राजकीय हस्तक्षेप केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी लावून धरली होती. वाढत्या राजकीय दबावामुळे चाकणकर यांना अखेर राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp