digital products downloads

पुण्याच्या नांदेड सिटीतील सून हत्या प्रकरण: फरार सासरा 8 दिवसांनंतर जळगावमध्ये जेरबंद, खून करून घराला कुलूप लावून झाला होता पसार – Pune News

पुण्याच्या नांदेड सिटीतील सून हत्या प्रकरण:  फरार सासरा 8 दिवसांनंतर जळगावमध्ये जेरबंद, खून करून घराला कुलूप लावून झाला होता पसार – Pune News



पुण्याच्या उच्चभ्रू नांदेड सिटी परिसरात आपल्या सुनेची निर्घृण हत्या करून गेल्या आठ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या भानुदास भास्कर चौधरी या सासर्‍याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने अटक केली आहे. सुनेला संपवून फरार झालेला हा आरोपी जळगावमध्ये लपून बसला असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. या अटकेमुळे गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला आरोपीचा शोध अखेर संपला असून पुणे पोलिसांकडून आता पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड सिटी परिसरात 2 मे रोजी घरगुती वादातून सासरा भानुदास चौधरी याने आपली सून स्वाती तेजस चौधरी हिच्या डोक्यात गंभीर वार करून तिची हत्या केली. या क्रूर कृत्यानंतर आरोपीने घराला बाहेरून कुलूप लावून तेथून पळ काढला होता. याप्रकरणी पुण्यातील हवेली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या धक्कादायक घटनेने संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली होती. पोलिस आरोपीचा शोध घेत असताना तो जळगाव शहरातील मेहरूण गावात लपल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने मेहरूण परिसरातील महादेव मंदिर परिसरात सापळा रचला आणि पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली. जळगाव पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी भानुदास चौधरी याला प्राथमिक चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, आठ दिवसांपासून फरार असलेला मुख्य आरोपी जेरबंद झाल्याने आता या प्रकरणाच्या तपासाला वेग येणार आहे. कौटुंबिक वादातून एका सासर्‍याने स्वतःच्या सुनेचा निर्घृण बळी घेतल्याच्या या धक्कादायक प्रकारामुळे पुण्यातील उच्चभ्रू नांदेड सिटी परिसरात अद्यापही भीती आणि खळबळीचे वातावरण आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp