digital products downloads

पुणे आरएमसी उद्योग उद्यापासून सुरू: प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादानंतर मार्ग मोकळा; लवकरच हेल्पलाईन सेवा – Pune News

पुणे आरएमसी उद्योग उद्यापासून सुरू:  प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादानंतर मार्ग मोकळा; लवकरच हेल्पलाईन सेवा – Pune News



पुणे जिल्ह्यातील रेडी मिक्स काँक्रीट (RMC) उद्योगासमोरील पेच अखेर सुटला आहे. पुणे आरएमसी असोसिएशनने उद्या, शनिवार, ९ मे २०२६ पासून जिल्ह्यातील सर्व आरएमसी प्लांट पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर हा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून आरएमसी उद्योगाला विविध तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत होता. यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र दुड्डी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पुढाकार घेण्यात आला. पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज पाटील, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए या सर्व प्राधिकरणांच्या समन्वयाने एक व्यवहार्य नियमावली तयार करण्यात आली आहे. आरएमसी उद्योगामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आणि पारदर्शकता जपण्यासाठी असोसिएशनने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. उद्योगाच्या वतीने लवकरच एक टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला जाईल. आरएमसी वाहनांद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन, बेफिकीर वाहन चालवणे किंवा प्लांटमुळे होणारे प्रदूषण यासारख्या समस्या आढळल्यास नागरिक या क्रमांकावर तक्रार करू शकतील. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित प्राधिकरणांच्या मदतीने त्वरित कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. पुणे आरएमसी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांनी सांगितले की, आरएमसी हा बांधकाम क्षेत्राचा अविभाज्य भाग आहे. आम्ही केवळ समस्या नाही, तर विकासाच्या उपायाचा एक भाग आहोत. ३०० हून अधिक सदस्यांशी चर्चा करून ९ मे पासून कामकाज सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन केले जाईल, असेही वाल्हेकर यांनी स्पष्ट केले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp