digital products downloads

पंतप्रधानांच्या सल्ल्याला मंत्र्यांचीच ‘केराची टोपली’: साताऱ्यात ‘आवास’ सोहळ्याच्या नावाखाली 400 एसटी बसेस, हेलिपॅड्ससाठी लाखोंची उधळपट्टी – Pune News

पंतप्रधानांच्या सल्ल्याला मंत्र्यांचीच ‘केराची टोपली’:  साताऱ्यात ‘आवास’ सोहळ्याच्या नावाखाली 400 एसटी बसेस, हेलिपॅड्ससाठी लाखोंची उधळपट्टी – Pune News



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आणि काटकसरीचे आवाहन देशवासियांना केले असताना साताऱ्यात शुक्रवारी प्रधानमंत्री आवास योजनेतील 5 लाख घरांच्या लोकार्पणाचा भव्य सोहळा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी हेलिपॅड, लाभार्थ्यांसाठी 400 एसटी बसेस, हजारो फूड पॅकेट्स आणि पंखे, कुलरसाठी लाखोंची उधळपट्टी सुरू असल्याने मोदींच्या आवाहनाला खुद्द भाजप सरकारकडूनच केराची टोपली दाखवली गेली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी 30 लाख घरे मंजूर केली होती. त्यातील पूर्ण झालेल्या 5 लाख घरांचे लोकार्पण आणि योजनेसाठी 10 हजार कोटी निधीच्या वितरणाचा कार्यक्रम सातारा येथे शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थित होणार आहे. कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी कार्यक्रमाला जास्तीत जास्त लाभार्थी उपस्थित राहण्यासाठी 400 एसटी बसेसचे नियोजन करा. त्यांच्यासाठी फुड पॅकेट्स, जागोजागी पंखे आणि कुलरची व्यवस्था करण्याचे आदेशही दिले. दरम्यान, मंत्री महोदयांच्या संख्येनुसार हेलिकॉप्टर उतरण्यासाठी हेलिपॅड तयार केले जातील, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. आवास योजनेतील घरांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी सातारा सैनिक स्कूलच्या मैदानावर भव्य मंडप उभारणी सुरू आहे. कार्यक्रमास केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याने शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने खर्चाचा देखील धुरळा उडाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काटकसरीचे आवाहन केले असताना भाजपच्याच मंत्र्यांकडून त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जाणार आहेत. कार्यक्रमावर सरकारी तिजोरीतून होणाऱ्या खर्चावर विरोधक बारीक लक्ष ठेऊन आहेत. त्यामुळे भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांना आयतं कोलीत मिळालं आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp