
हडपसर भागातील एका खासगी रुग्णालयात बुधवारी सायंकाळी बॉम्ब सदृश वस्तू सापडल्याने घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोधक नाशक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तपासणीत बॉम्ब सदृश वस्तूत जिलेटिनच्या कांड्या आढळल्या. पोलिसांच्या पथकाने त्या सुरक्षित ठिकाणी नेऊन निकामी केल्या. हडपसर भागात खासगी रुग्णालय आहे. रुग्णालयाच्या प्रसाधनगृहात बॉम्ब सदृश संशयास्पद वस्तू एकाने सायंकाळी पाहिली. त्याने या घटनेची महिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर बॉम्ब शोधक नाशक पथक (बीडीडीएस), हडपसर पोलीस, तसेच अग्निशमन दलाचे पथकाने घटनास्थळी धाव घेतली. रुग्णालयाच्या परिसरातील सुरक्षा वाढविण्यात आली. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाने संशयित वस्तूची तपासणी केली. तेव्हा त्यात जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या. जिलेटिनच्या कांड्या सुरक्षित ठिकाणी हलवून त्या निकामी करण्यात आल्या. दरम्यान, या घटनेनमुळे रुग्णालयाच्या परिसरात घबराट उडाली. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






