digital products downloads

अशोक खरात प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही: सुनील तटकरेंची भूमिका, चाकणकरांच्या राजीनाम्यावर एका वाक्यात उत्तर – Mumbai News

अशोक खरात प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही:  सुनील तटकरेंची भूमिका, चाकणकरांच्या राजीनाम्यावर एका वाक्यात उत्तर – Mumbai News



नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचे पडसाद आता थेट राज्य सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणावर उमटू लागले आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर रूपाली चाकणकर यांनी आधीच आपल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, “या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही,” अशी महत्त्वाची भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मांडली आहे. दरम्यान, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार या ६ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. मुंबईतील उपमुख्यमंत्री निवासस्थान ‘देवगिरी’ बंगल्यावर आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री, सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल पटेल उपस्थित होते. या बैठकीत आगामी बारामती पोटनिवडणुकीची रणनीती आणि रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत, रूपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर भाष्य केले. नेमके काय म्हणाले सुनील तटकरे? सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले की, “रूपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा प्राप्त झाला आहे. उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार हा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करतील.” चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा देणार का? या प्रश्नावर तटकरे म्हणाले की, “या विषयावर अद्याप चर्चा झालेली नाही. ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी पक्ष यावर निर्णय घेईल. मात्र, अशोक खरातने जे दुष्कृत्य केले आहे, त्यावर कडक कारवाई व्हावी हीच पक्षाची ठाम भूमिका आहे.” सुनेत्रा पवार ६ एप्रिलला भरणार उमेदवारी अर्ज बारामती पोटनिवडणुकीच्या संदर्भात माहिती देताना सुनील तटकरे यांनी सांगितले की, “बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा वहिनींचा अर्ज ६ एप्रिल रोजी भरला जाणार आहे. या निवडणुकीच्या तयारी संदर्भात आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली असून, महायुती पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार आहे.” रूपाली चाकणकरांचा राज्य महिला आयोगाचा राजीनामा दरम्यान, अशोक खरात याचे पाद्यपूजन करतानाचे रूपाली चाकणकर यांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. यामुळे रूपाली चाकणकर चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. विरोधी पक्षांनी चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. नैतिक जबाबदारी स्वीकारत चाकणकर यांनी अखेर शुक्रवारी आपला राजीनामा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवला.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp