
आपल्याला इतिहास शिकवला गेला त्यात मुघल गेल्यावर थेट ब्रिटिश आले आणि राज्य केले असे सांगितले जाते पण ते चुकीचे आहे. दरम्यानच्या 100-125 वर्षात वेगवेगळ्या स्वरूपात राज्य ठिकठिकाणी सुरू होती. 28 वर्ष अहिल्यादेवी होळकर यांनी उत्कृष्ट कारभार चालवला. त्यां
.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ‘युवा प्रेरणा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात या होता.यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे आमदार व महासचिव विक्रांत पाटील, आमदार योगेश टिळेकर, आमदार हेमंत रासने, आमदार शंकर जगताप, भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे ,भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे ,निवेदिता एकबोटे , करण मिसाळ आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आज आपण अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीच्या निमित्ताने एकत्र आलो. 300 वर्षांनंतर त्यांच्या कारभाराची आठवण का काढली जाते.कारण ज्यावेळी देशात परकीय आक्रमक यांनी देशावर आणि भारतीय संस्कृती पाळेमुळे यावर हल्ला केला. त्यांना समजले होते की, भारतीय समाज एकसंध आहे कारण त्याच्यात आध्यात्मिक ताकद प्रबळ आहे, त्यामुळे आपली संस्कृतीची जी मानके होती ती तोडणे, उध्वस्त करणे काम आक्रमकांनी केले. भारतीयाची शक्तिस्थळ, देवस्थाने नष्ट करण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. परंतु अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण देशात जी पुण्यस्थळे आणि शक्ती स्थळे, घाट आहे त्याचे पुनर्जीवन करण्याचे काम केले. आज ज्योतिर्लिंग जी चांगल्या स्थितीत दिसतात त्याचे श्रेय अहिल्यादेवी यांना आहे. औरंगजेब सारख्या नालायक लोकांनी आपली मंदिरे उद्ध्वस्त करण्याचे काम केले. आपल्या संस्कृतीचे पुनर्जीवन करण्यात अहिल्यादेवी यांचा मोठा वाटा आहे. अनेक चांगले उत्कृष्ट जलशास्त्र वापरून जलसंधारण काम त्यांनी केले. अहिल्याकालीन जलसंचय काम त्याकाळात उत्तम झाले. एक कर पद्धत लावून सामान्यांना दिलासा त्यांनी दिला. योग्य दुष्काळ नियोजन केले. राज्यकारभार चालवताना अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्याचे काम त्यांनी केले. महेश्वरी येथे विणकर बाहेरून आणून नवीन बाजारपेठ निर्माण केली आणि आयात – निर्यात धोरण माध्यमातून राज्य समृद्ध केले. त्यांनी देशभरात मोठ्या प्रमाणात वैयक्तिक खर्चातून स्थापत्य कामे केली. साधी जीवनशैली त्यांनी अंगिकारली होती.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



